Mon, Mar 2, 2026
सामाजिक

रोटरी क्लब ऑफ वाईला प्रांतपाल यांची भेट, नवीन उपक्रमांचे उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ वाईला प्रांतपाल यांची भेट, नवीन उपक्रमांचे उद्घाटन
Ashok Ithape
  • PublishedMarch 26, 2024

वाई l दि. 26

दिनांक ३१मार्च २०२४ रोजी, रोटरी क्लब ऑफ वाईयेथे प्रांतपाल स्वाती हेरकळ मॅडम यांची व्हिजीट नियोजित आहे. वर्षभर जे प्रोजेक्ट वाई रोटरीक्लब ने राबवलेले असतात त्यांचा आढावा या भेटीत घेतला जातो.

रोटरी चे सेव्हन फोकस एरियाज आहेत, त्यामधून समाजात शाश्वत असे बदल घडवून आणलेले, कोणते उपक्रम झाले आहेत? शिक्षण, व्यवसाय वाढीसाठी, शेती मध्ये काही बदल घडवणारे काही उपक्रम, पर्यावरण, आरोग्य शिबिरे, महिलांना सक्षम करणारे असे काही उपक्रम राबवले गेले आहेत का याविषयी  उहापोह केला जातो.

त्याच बरोबर प्रांतपाल भेटी दिवशी काही नवीन उपक्रमांचे उद्घाटन केले जाते. यावेळी शिक्षणघेत असणाऱ्या आणि कोणतीही सुविधा नसणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींसाठी सायकल देण्यात येणार आहेत. यासर्व सायकलींची बँक शाळेत केली जाईल आणि त्या सायकली मुलींना देण्यात येतील.

वाई तालुक्यातील २४ जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयासाठी कपाटे वाटप करण्यात आलेली आहेत आता या प्रत्येक शाळेला पुस्तके ही देण्यात येणार आहेत.
परिवर्तन ग्राम मेणवली, भोगाव, पांडेवाडी मध्ये, शेती अवजारांची बँक देण्यात आली आहे. वाई रोटरी क्लब,डिस्ट्रिक्ट ३१३२आणि डिस्ट्रिक्ट ६५५० मधील तीनरोटरी क्लबच्या मदतीने देण्यात आली आहे.

तेथील शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञान कार्यशाळा आयोजित केली होती. सेंद्रिय खत निर्मितीसाठी ड्रमचे वाटप ही करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये सहभागी शेतकरी बांधवांचा सन्मान करण्यात येणार आहे.

वाई रोटरी क्लब चे सदस्य ज्यांनी द रोटरी फाउंडेशन ला सढळ हाताने मदत केली आहे त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रम स्थळ: सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा वाई, दि.३१ मार्च रोजी संध्याकाळी ६ते८ हा कार्यक्रम आहे. अशी माहिती वाई रोटरी क्लबच्या अध्यक्षा रो.डॉ.प्रेरणा ढोबळे यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!