विकास तानाजी नवले शेलारवाडी यांना बावधन बगाड्याचा बहुमान
बावधन दि. 25 :
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या बावधन तालुका वाई जिल्हा सातारा येथील श्री काळभैरवनाथ बगाड यात्रा शनिवार दिनांक 30 मार्च रंगपंचमी दिवशी असून यंदाचा बगाड्या होण्याचा बहुमान श्री विकास तानाजी नवले बावधन जवळील शेलारवाडी तालुका वाई यांना मिळाला आहे.
बगाड्या विकास नवले यांचे मोठे बंधू वैभव नवले यांनी काळभैरवनाथ 2010 साली आपली मोठी बहीण हिला आपत्य मूलबाळ व्हावे यासाठी नवस केला होता. बावडा तालुका खंडाळा येथील बहिण तेजश्री राजेंद्र पवार यांना मूलबाळ होत नव्हते म्हणून नवले कुटुंब दुःखी होते म्हणून बहिणीसाठी भावाने बगाड घेण्यासाठी नवस केला. बहिण तेजश्री हिला नवस केल्यानंतर 2011 ला मुलगा अजिंक्य पवार झाला आपल्या बहिणीला मुलगा झाल्याचा आनंद नवले परिवाराला झाला होता तेव्हापासून ते नवस फेडण्यासाठी कौलाला बसत होते.
यावर्षी काळभैरवनाथाचा नवस फेडण्यासाठी 51 नवसकरी बसले होते विकास यांचा सहावा नंबर होता त्यांच्या नावाचा कौल आल्याने यंदाचा बगाड्या होण्याचा मान शेलारवाडीच्या नवले यांना मिळाला आहे.
शेलारवाडी गावाची बावधन च्या काळभैरवनाथावर अपार श्रद्धा व भक्ती आहे शेलारवाडीत आजपर्यंत रामचंद्र मारुती दानवले १९९६ शेलारवाडी हनुमंत मांढरे शेलारवाडी, साहेबराव शंकर मांढरे शेलारवाडी, नथुराम बजाबा भिलारे शेलारवाडी, भगवान बाळकृष्ण शेलार शेलारवाडी, बाळासाहेब हनुमंत मांढरे शेलारवाडी, व यंदा विकास नवले यांना बगाड्याचा मान मिळाला आहे.
नवले हे शेतकरी कुटुंबातील असून वडील तानाजी आनंदराव नवले, आई भारती नवले, आजी ताराबाई आनंदराव नवले, भाऊ वैभव नवले, वहिनी लता वैभव नवले असा त्यांचा परिवार असून बागड्याचा मान मिळाल्याने बावडा येथील पवार व नवले परिवारासह संपूर्ण शेलारवाडीत आनंदी वातावरण पसरले आहे
-दिलीप कांबळे, पत्रकार बावधन













