महर्षी कर्वे बीसीए महाविद्यालयात सामंजस्य करार संपन्न
वाई / प्रतिनिधी:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बीसीए महाविद्यालय व पुणे स्थित ऑरेंज आयटेक कंपनी ह्यांच्यात १६ मार्च रोजी सामंजस्य करार पार पडला.
यावेळी कंपनीच्या संचालिका सौ. अर्चना निगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओंकार वैद्य, प्राध्यापक व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींसाठी आयटी उद्योगासंबंधित चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, परिसंवाद, कौशल्य विकास शिबिरे आयोजित करणे व इंटर्नशिप, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही या कराराची उद्दिष्ट्ये आहे.
हा सामंजस्य करार अमलात आणण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली तसेच संस्थेच्या सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.













