सातारा कारागृहातील नवीन किचनचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमधून सातारा जिल्हा कारागृहामधील बंदयांसाठी नवीन स्वयंपाकगृहाचे (किचन) बांधकाम पूर्ण झाल्याने त्याचे उद्घाटन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पुणे विभाग यांच्या हस्ते करण्यात आले.
सातारा जिल्हा कारागृहामध्ये जवळपास एकूण 350 पुरुष व महिला बंदी असून या कारागृहाची अधिकृत क्षमता केवळ 168 आहे. असे असून देखील वाढत्या बंदी संख्येमुळे कारागृहात बंदी क्षमतेपेक्षा दुपटीने जास्त बंदी ठेवणे क्रमप्राप्त होत आहे. सातारा जिल्हा कारागृह हे शहराच्या मध्यभागी असून त्यामुळे सुरक्षेची बाब म्हणून तसेच नागरिकांच्या अडीअडचणी म्हणून हे कारागृह शहरापासून दूर ठिकाणी सुरक्षित जागेवर नवीन होणे आवश्यक असल्याबाबतची भावना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. याच अनुषंगाने कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांनी देखील हे जिल्हा कारागृह असून याच्या ऐवजी मध्यवर्ती कारागृह (सेंट्रल जेल) होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे येरवडा मध्यवर्ती कारागृह व कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे झालेल्या जास्तीच्या बंदी संख्येला कंट्रोल करणे व त्या कारागृहातील कैदी सातारा मध्यवर्ती कारागृहामध्ये वर्ग करणे सोयीचे होईल. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न व प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली.

नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब पाचगणीच्या अध्यक्षा संगीता पाटील व त्यांची टीम यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहातील महिला बंदीसाठी नवीन शिलाई मशीन भेट देऊन कारागृहातील महिला बंदींना ब्लाउज, पेटिकोट, कापडी पिशवी इत्यादी शिवणकामाचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे यांच्या हस्ते झाले
नवीन स्वयंपाकगृहाचे उद्घाटन केल्यानंतर कारागृहातील इतर बाबींची देखील पाहणी श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. ज्यामध्ये कारागृहात बंदिंसाठी नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या “किऑस्क यंत्रणेची” देखील माहिती घेतली. कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेऊन कारागृहात सुरू असलेले नवनवीन उपक्रम याचा देखील आढावा घेण्यात आला. कारागृहाच्या सुशोभीकरणावर देखील नजर टाकण्यात आली. कारागृह सुरक्षा सह या सर्वच बाबी अत्यंत कुशलपणे हाताळल्यामुळे कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे व त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास शामकांत शेडगे कारागृह अधीक्षक, श्री खैरमोडे उपअभियंता साबांवि, श्रीमती संगीता पाटील अध्यक्ष, इनरव्हील क्लब, पाचगणी, ज्ञानेश्वर दुबे वरिष्ठ तुरुंग अधिकारी, राजेंद्र भापकर वरिष्ठ तुरुंग अधिकारी, श्रीमती सावंत सहाय्यक अभियंता साबांवि, श्रीमती कुंटे तुरुंग अधिकारी, श्री सचिन भंडारे शेती मार्गदर्शक, सुभेदार मानसींग बागल, दत्ताजी भिसे, हवालदार दिलीप बोडरे, सुदाम बर्डे, नामदेव खोत, शिपाई रंजीत बर्गे, दगडू सरवणे, हर्षल जाधव, दत्ता भामरे, अहमद संदे, चेतन शहाणे, प्रभाकर माळी, चांद पटेल, बालाजी मुंडे, यशवंत पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, सागर मासाळ, जयश्री पवार, प्रतीक्षा मोरे, अंकिता करपे, रूपाली नलावडे, अश्विनी पुजारी, रेश्मा गायकवाड, काजल सायमोते, हेमंत यादव, नानासो डोंगळे, गणेश सूळ, रविराज शेळके, सुर्यकांत ठोंबरे इत्यादी उपस्थित होते.













