मुख्याधिकारी अभिजीत बापट सातारच्या सर्वांगीण प्रगतीचे दीपस्तंभ – श्रीरंग काटेकर
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
ध्येयवादी वृत्तीने झटणारे कुशल व कर्तव्यदक्ष असलेले सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीच्या पाठबळाने 1000 कोटीच्या निधीची पूर्तता पूर्ण करून नवीन विकास पर्व निर्माण केले असून ते खऱ्या अर्थाने सातारच्या प्रगतीचे दीपस्तंभ ठरले असल्याचे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
सातारा येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कर्ण फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या अभिजीत बापट यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
यावेळी कर्ण फौंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे, पदाधिकारी दत्तात्रय सांगलीकर ,विजयकुमार कुलकर्णी, हेमंत जोशी, कुमार लोखंडे, विजय भोईटे, सिद्धी कोल्हापूरे, अदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
श्रींरंग काटेकर पुढे म्हणाले की, कास प्रकल्पाला गती देऊन भविष्यातील पन्नास वर्षाचा सातारकरांचा पाणी प्रश्न मार्गी लावला आहे तर विविध विकासकामे गतिमान केली आहेत .कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले की नागरी प्रश्नाबाबत संवेदनशील असणारे मुख्याधिकारी सातारा शहराला लाभले हे येथील नागरिकांचे भाग्य आहे .सातारच्या विविध प्रश्नांची जाण असणाऱ्या अभिजीत बापट यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणाले की नागरी प्रश्नांची सोडवणूक करणे हे माझे कर्तव्य आहे येथील नागरिक व सातारचे लोकप्रतिनिधी यांचे अनमोल सहकार्य व पाठबळामुळेच हे शक्य झाले आहे. प्रारंभी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार दत्तात्रय सांगलीकर यांनी केले.
प्रतिकूलतेवर मात करीत विविध प्रकल्प व योजनांना यशस्वीपणे राबवून शहराची प्रगती गतिमान करण्यात मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे मोलाचे योगदान राहिले आहे विशेषतः आरोग्यसेवा, पाणीपुरवठा ,वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन तसेच छत्रपती संभाजी राजे स्मारक उभारणी, शिवतीर्थ सुशोभीकरण, भुयारी गटार योजना अदि बाबत पुढाकार घेऊन ते सातारची प्रगतीत योगदान देत आहेत.













