देगाव येथे सोमवारी बाल कीर्तनकार माऊली महाराज जाहुरकर यांचे सुश्राव्य कीर्तन
![]()
कै. कमल इथापे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजन.
वाई / प्रतिनिधी : देगाव (ता. वाई) येथील कै. कमल महादेव इथापे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त येत्या सोमवारी देगावमध्ये धार्मिक विधी, अभिवादन कार्यक्रमासह बाल कीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर ( छोटे इंदुरिकर ) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता झी टॉकीज फेम दहा वर्षीय बाल कीर्तनकार ह. भ. प. माऊली महाराज जाहूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन व त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. रामदास इथापे व कुटुंबीयंतर्फे करण्यात आले आहे.













