प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
भुईंज l दि. २९
प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीजास्त रक्तदात्यांनी या सर्वश्रेष्ठदान उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.
३५ वे रस्ता सुरक्षा अभियान” अंतर्गत विविध उपक्रम राबविणेत येत असून अपघातग्रस्त व्यक्तींना रक्ताची गरज भासत असते. रक्तदानाबाबत जगजागृती होण्याच्या उद्देशाने दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी, सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे बालाजी ब्लड सेंटर, सातारा यांचे सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना प्रोत्साहनपर हेल्मेट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच रक्तदान करून सर्वश्रेष्ठ दानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगीतले आहे.













