Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल वाटप

शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त सायकल वाटप
Ashok Ithape
  • PublishedJanuary 24, 2024

भुईंज ।  महेंद्रआबा जाधव :

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेव ठाकरे यांच्या जयंती निमित्त आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सातारा शहरातील विविध शाळांमधील गरीब, हुशार व ग्रामीण भागातून येणा-या १५ मुलींना यावर्षी सायकल वाटप करण्यात आले तसेच दिव्यांग व निराधार बांधवांना ५०० चादर, ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.

केंद्रीय विक्रिकरचे (GST) चे डेप्यटी कमिशनर श्री. श्रीकांत राऊत साहेब आणि पालेकर बेकरीचे संचालक श्री. ज्ञानेश पालेकर यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना चादर, ब्लॅकेट व मुलींना सायकल वाटप करण्यात आले तसेच मातोश्री वृध्दाश्रमातील आजी आजोबांना चादर व ब्लॅकेटचे वाटप धनश्री इलेक्ट्रीकल्सचे श्री. राहूल जाधव यांच्या मातोश्री यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व शाहू बोर्डिंगमधील अनाथ मूलांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे उपप्रमुख आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले यांनी ६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेत घेतलेल्या यशस्वी सहभागाबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय विक्रिकरचे (GST) चे डेप्यटी कमिशनर श्री. श्रीकांत राऊतसाहेब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यकमाच्या सुरूवातीस प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यकमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. बाळासाहेब शिंदे यांनी केले तर कार्यकमाचे सूत्र संचालन उपाध्यक्ष शिवाजीराव इंगवले यांनी केले आणि दिपक पाटील यांनी आभार मानले. या कार्यकम प्रसंगी बोलताना केंद्रीय विकिकरचे (GST) चे डेप्यटी कमिशनर मा. श्री. श्रीकांत राऊतसाहेब यांनी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपयोगी कार्यकमाचे कौतुक केले.

या कार्यकमास प्रतिष्ठानचे सदस्य ॲड विनोद निकम, मनोहर निंबाळकर, निलेश शिंदे, कुमार पोतदार, विशाल भोसले, अनिल शिंदे, सिध्दार्थ शिंदे, मंगेश शिंदे, शांताराम भणगे तसेच शिवसेनेचे शिवेंद्र ताटे, सादीकभाई बागवान, अशुतोष पारंगे, राजू नाईक, सचिन शिंदे, विनायक शिंदे, शिवाजी पवार व पेठेतील नागरीक उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!