ग्रामपंचायत सुरूर ता. वाई येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महास्वच्छता अभियान
ग्रामपंचायत सुरूर ता. वाई येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दि. 8/1/2024 रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, बचतगट महिला, युवक, श्री. शिवाजी विद्यालय यांचे सर्व शिक्षक यांनी सहभाग नोंदविला.
पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छतेची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे त्या अनुषंगाने शासनाच्या विविध उपक्रम जसे की स्वच्छता हि सेवा, स्वच्छ ग्रामीण मिशन, संत गाडगेबाबा अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ऊपक्रम गाव पातळीवर राबविण्यात येतात त्यामध्ये सुरूर हे गाव नेहमीच सर्व अभियानात अग्रेसर असते.
नुकतेच मा. ना. शंभूराज देसाई मंत्री उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री सातारा व ठाणे जिल्हा यांनी राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये विशेष अभियान सुरु केले आहे यामध्ये गावठाण मधील व गावठाण बाहेर, रस्त्याच्या कडेला, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक, दुकानदार, ग्रामस्थ यांच्यावर कायदेशिर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.
त्याप्रमाणे आज ग्रामपंचायत सुरूर येथील बाजारतळ, सर्व सार्वजनिक ठिकाणे, हायवे परिसर, गावातील सर्व वार्ड, बस्थानक याठिकाणी स्वच्छता करण्यात आली यावेळी सुमारे 2 टन कचरा गोळा करण्यात आला तसेच जास्त प्रमाण कचरा पडणाऱ्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करणार असलेबाबत बाबत सूचना फलक लावण्यात आले.
जनतेमध्ये स्वच्छतेबाबत जन जागृती करण्याकरिता गृहभेटी, ऑडिओ क्लिप द्वारे नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे , शास्वत स्वच्छता ठेवणे साठी माहिती मार्गदर्शन करणे अशा उपायोजना राबविण्यात आल्या यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी मा. श्रीमती. सपना गोळवे मॅडम व पंचायत समिती वाई चे गटविकास अधिकारी मा. श्री. नारायण घोलप सर, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ तसेच विस्तार अधिकारी श्री. रुपेश मोरे, श्री भालेराव, जिल्हा सल्लागार श्री. सोनावणे, BRC श्री. जाधव, श्री. खेडकर, ग्रामविकास अधिकारी श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.













