Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन

चिरतरुण भारत भाई

चिरतरुण भारत भाई
Ashok Ithape
  • PublishedJanuary 6, 2024

आदरणीय भारतभाई…

या जगण्यावर शतदा प्रेम करावे..या सारख आनंदी आणि प्रेमळ जगण्याचे भाग्य घेऊन वाटचाल करणारी माणस बघितलं की अनेकांचे जगणं सुसह्य होत..भारतजी आपणही याच पठडीतले…! इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज हातावेगळ्या करण हा तर तुमचा मूळ स्वभाव…जगण्यावर प्रेम करणाऱ्या,आनंदी,स्वच्छंदी,स्वानंदी अन चिरतरुण भारत भाई पुरोहित यांचा आज वाढदिवस,त्यानिमित्त

भाई,जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्र असलेल्या पाचगणी शहरात आपल्याला शिकण्याच भाग्य लाभलं..वडील किशोरजी पुरोहित यांच्या ‘पुरोहित लंच होम’च्या माध्यमातून आपण व्यवसायाचे बाळकडू घेतले.त्याबरोबरच वडिलांचा समाजसेवेचा,मैत्री जपण्याचा,परोपकारी वृत्तीचा वसाही आत्मसाद करत गेलात.राजकीय पदात,राजकारण अडकण्याऐवजी आपण सामाजिक कार्याची रेषा अधिकाधिक गडद करत नेलीत. त्यातूनच युथ फोरम,पाचगणी अस्तित्वात आली,रोटरी क्लब बहरला तर रोटरॅक्ट क्लब वाढीला लागला.आय लव्ह पाचगणी फेस्टिवल लोकमान्य झाला..!

या सगळ्या उपक्रमात आपण कधीच पुढे पुढे करताना दिसला नाहीत अथवा श्रेयवादात अडकला नाहीत.त्यामुळेच की काय पाचगणी फेस्टिवल मधील आपले सहकारी देखील आपण घालून दिलेल्या पायवाटेवरून सगळ्यांना बरोबर घेऊन चालले आहेत.
भारत भाई,आपण एम.कॉम करून हॉटेल मॅनेजमेंट केले.घरच्या हॉटेल व्यवसायाचा अनुभव असल्याने आपण सन्मित्र राजू पार्टे यांच्या पारशी पॉईंट वरील जागेत ‘पुरोहित फूड स्नॅक्स अँड ज्यूस बार’ हा व्यवसाय सुरू केलात. तो तुमचा पहिला प्रयोग तितकासा यशस्वी झाला नाही.पण तुम्ही निवडलेली जागा योग्य होती,हे त्याचं जागेवर उभारलेल्या ‘रेनफॉरेस्ट रेस्टॉरंट’ च्या यशाने दाखवून दिले.तुमच्या नशिबात वेगळं काहीतरी लिहल गेलं होत.ते शोधून काढण्यासाठी तुमचा संघर्ष सुरू होता.

त्यानंतर तुम्ही पाचगणी बस स्थानका समोरील ‘हॉटेल पान हिल’ चालवायला घेतलंत.सलग ३ वर्षे आपण या हॉटेलची धुरा सांभाळलीत.मग आपण फाईव्ह हिल्स हे हॉटेल चालवायला घेतलेत.पण इथेही तुम्ही रमला नाहीत.आपल्या गाडीला टॉप गिअर टाकायला संधी मिळाली नाही.

भाई,आपण धडपडत होतात,निखळ यश मिळत नव्हतं, म्हणून आपण थकला नाहीत.हार मानली नाहीत.अनुभवाचं गाठोडं पाठीशी बांधून आपण चालत राहिलात.’खुदी कर बुलंद इतना की हर तकदीर से पेहले खुदा खुद बंदे से पुछे बता ‘तेरी रझा क्या है..!’या नुसार आपण मेहनत करत राहिलात,शिंपले शोधत,धुंडाळत राहिलात.,१९९७ साली आपणास आपल्या व्यावसायिक स्थैर्याचा मार्ग सापडला.आपण पाचगणी शॉपिंग सेंटर मध्ये ‘नमस्ते पुरोहित’ हा व्यवसाय सुरू केलात अन मग आपण मागे वळून पाहिलेच नाही.

गेल्या २७ -२८वर्षात आपण या व्यवसायात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केलीत.आपले अध्यात्मिक गुरू ‘स्वामी कृष्ण चैतन्य’ महाराज यांचे कृपाशीर्वाद,आई वडिलांची आणि मित्रांची पुण्याई यामुळे आपण हॉटेल व्यावसायिक म्हणून यशस्वी झालात.
भाई,आम्ही तुम्हाला पाचगणीच्या भल्यासाठी झटणारा,शहर विकासासाठी कमालीचा आग्रही असणारा,पाचगणीतील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवणारा भला माणूस म्हणून नेहमीच आदराने बघतो.पाचगणीतील बहुतेक सामाजिक उपक्रमाचे नमस्ते पुरोहित मध्ये बसूनच आयोजन केले जाते.आपण स्वतः आणि आपले नमस्ते पुरोहित शहर विकासासाठी नेहमीच उपलब्ध असते हे देखील आज नम्रपणे नमूद करावेच लागेल.

भारत भाई,आपल्या मिशीचा आकडा लय लय वाकडा आहे..तो आता आपल्या हॉटेल चा लोगोच बनलाय..पण आपलं वागणं साधं सरळ आणि संवेदनशील आहे.टेबल लँड वरील दुर्मिळ फुल शोधणार,त्यांना कॅमेराबद्ध करणारं,त्यांना समाजमाध्यमात प्रसिद्ध देणार आणि निसर्गाच्या सानिध्यात रममाण होणार आहे.यामुळेच आपल्या वाढत्या वयाचा चेहऱ्यावर,मनावर आणि शरीरावर कोणताही लवलेश आलेला दिसत नाही.आपल्या चिरतरुण राहण्याचे हेच रहस्य असावे.

आपणास वाढदिवस शुभेच्छासह उत्तमोत्तम आरोग्य आणि अबाधित चिरतारुण्य लाभावे या सदिच्छा..

सचिन ननावरे

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!