पूना कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
पुणे l प्रतिनिधी :
पूना कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पूना कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना , राष्ट्रीय छात्र संघ,विद्यार्थी कल्याण मंडळ, कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2 विभागातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सांस्कृतिक,पथनाट्य या कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली. कु. शिद्रा शेख व कु. शिफा सय्यद यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्य संदर्भात आपले विचार व्यक्त केले.
पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ.अन्वर शेख यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आणि योगदानावर प्रकाश टाकला व सामाजिक समानतेचा प्रसार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले.
सदर कार्यक्रमात कु. समिक्षा धारीवाल हिने सावित्रीबाईची वेशभूषा करून “मी सावित्रीबाई बोलते आहे”… च्या माध्यमातून मुलींची संवाद साधला. पर्यवेक्षिका नसीम खान यांनी स्त्रियांच्या समस्येबद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य इम्तियाज आगा यांनी केले .कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.असद शेख, डॉ . अकबर सय्यद ,इम्रान पठाण यांनी केले. सदर कार्यक्रमाला डॉ. शाकीर शेख, डॉ. बाबा शेख, डॉ. इरम खान , डॉ. मुख्तार शेख , सलमान सय्यद ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका वंदना शेखर व आभार फातेमा नगरवाला हिने मानले. या प्रसंगी सावित्रीबाई लिखित पुस्तके विद्यार्थांना उपहार म्हणून देण्यात आली.













