वाई फेस्टिवल २०२३ च्या निमित्ताने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात संपन्न
वाई फेस्टिवल २०२३ च्या निमित्ताने सातारा जिल्हा बॅडमिंटन असो. व वाई बॅडमिंटन असो. आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक ८ डिसेंबर २०२३ ते १० डिसेम्बर २०२३ या कालावधीमध्ये उत्साहात संपन्न झाल्या.
वाई शहराला सुमारे ३० ते ३५ वर्षांची बॅडमिंटन खेळाची परंपरा आहे, आणि हि परंपरा अखंडित ठेवण्यासाठी प्रामुख्याने श्री वैभव फुले, अमीर बागुल, अमर कोल्हापुरे, नितीन वाघचौडे, विनीत पोफळे, स्वरूप मुळे, वेदांत खामकर, सागर पार्टे, दीपक हगीर, ओमकार सपकाळ, आदित्य माने व सायमन सर वाई मधील बाल व युवा वर्ग या खेळाकडे अधिकाधिक आकर्षित व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील असतात. याच उद्देशाने वाई बॅडमिंटन असो. ची स्थापना केली व या खेळाचा प्रचारासाठी या स्पर्धेचे आयोजन केले.
या स्पर्धेला ओम कदम, आदित्य जाधव , ऋषिकेश रणवरे , अनय हवळ यांनी पंच म्हणून कामकाज पहिले. स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रसंगी सौ प्रीती कोल्हापुरे, शिंदे फूड प्रोडक्ट चे श्री किशोर शिंदे, माजी नगरसेवक श्री चरण गायकवाड व विजय ढेकाणे, वाई फेस्टिवल च्या अध्यक्ष डॉ मंगला अहिवळे यांनी अतिथी पद भूषविले. या स्पर्धेत ९ वर्षाखालील मुले गटात विजेते रेयांश अभिजित राऊत, उपविजेते श्री अक्षय अमर कोल्हापुरे, ११ वर्षाखालील मुले गटात विजेते श्लोक मिलिंद भोसले व उपविजेते भावेश घोडके , १३ वर्षाखालील मुले गटात विजेते कौस्तुभ फुले व उपविजेते नील दिक्षित, १५ वर्षाखालील मुले गटात विजेते ओम मुळे व उपविजेते आदित्य सुजित पाटील, १७ वर्षाखालील मुले गटात विजेते तनिष्क महेश केंजळे व उपविजेते ओम मुळे, ९ वर्षाखालील मुली गटात विजेते ओमिशा कौस्तुभ मोरे , उपविजेते शरयू दिग्विजय कदम , ११ वर्षाखालील मुली गटात विजेते श्रद्धा इंगळे व उपविजेते मिताली महामुनी , १३ वर्षाखालील मुली गटात विजेते आनंदी चंद्रसेन जाधव व उपविजेते सूर्या अमित कणसे , १५ वर्षाखालील मुली गटात विजेते आर्या महेंद्र फाळने व उपविजेते आर्या सुजित भोसले, १७ वर्षाखालील मुली गटात विजेते आर्या सुजित भोसले व उपविजेते आर्या महेंद्र फाळने यांनी यश संपादन केले. याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष adv. रमेश यादव व संचालक श्री संजय वाईकर उपस्थित होते.













