पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबीराचे आयोजन
![]()
शिबीराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
सातारा दि. 17 : पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन करुन गरजुंना आरोग्य विषयक उपकरणांचे वाटपही करण्यात आले.
या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी व प्रमाणपत्र वितरण, अस्थिरोग तपासणी व अपंगत्व प्रमाणपत्र, कान,नाक,घसा तपासणी,त्वचारोग तपासणी, एन.सी.डी.विभाग,रक्तदाब,ब्लड शुगर,कॅन्सर तपासणी, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी,रक्तदान शिबीर,क्ष किरण तपासणी, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्य विषयक योग्य तो सल्लाही देण्यात आला. तसेच रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात आले.













