ओझर्डे येथील कार्यक्रमातील स्टंटबाजी ही केवळ राजकीय आकसापोटीच
त्या समाजकंटाकांचा तीव्र शब्दात निषेध; ओझर्डे ग्रामस्थांनी मिटींग केली यशस्वी*
दि. १०/११/२०२३ किसन वीर कारखान्याच्यावतीने कारखान्याला ऊस उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मिटींग आयोजित केलेल्या आहेत. त्यानुसार रविवार (दि. ५) रोजी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळ ओझर्डे येथे गेले असता त्याठिकाणी कल्याण पिसाळ व केशव पिसाळ यांनी मिटींगच्या ठिकाणी मज्जाव केला व मराठा आंदोलनाचे कारण पुढे करीत मिटींगला विरोध केला व मिटींग होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.
वास्तविक ते ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असूनही त्यांनी विरोध केला. परंतु कारखाना प्रशासनाने ओझर्डे गावच्या विकास सेवा सोसायटीमध्ये शेकडो ओझर्डे ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्याचवेळी मिटींग घेतली. यावेळी उपस्थितांना नितीनकाका पाटील यांनी मार्गदर्शनही केले.
कारखान्याच्या मागील व्यवस्थापनाने कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करून जवळपास १ हजार कोटींचे कर्ज कारखान्यावर करून कारखाना बंद पाडला होता. त्यामुळे किसन वीर कारखान्याची विश्वासर्हता राहिली नव्हती. परंतु आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने कारखान्याचे संस्थापक किसन वीर यांच्या नावाचा कारखाना बंद न पाडता सन २०२२-२३ हा हंगाम यशस्वीरित्या सुरू केला व सन २०२३-२४ चा हंगामही सुरू. केलेला आहे. ओझर्डे ग्रामस्थांनी ही मिटींग यशस्वी करून आम्ही आमचा संपुर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच देणार असल्याचा विश्वास व अभिवचनही दिले. ही मिटींग यशस्वी करून ओझर्डे ग्रामस्थांनी अशा विघ्नसंतोषी कल्याण पिसाळ व केशव पिसाळ यांना त्यांची जागा दाखवून देऊन त्यांचा जाहीर निषेधही ओझर्डे येथील खाली सह्या करणार ग्रामस्थांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केलेला आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर वाई – खंडाळा – महाबळेश्वर तालुक्याचे आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाचे वर्चस्व आहे. आमदार मकरंदआबा पाटील यांनी किसन वीर कारखाना वाचविण्यासाठी जीवाचे रान केलेले असून त्यांनी केलेल्या आवाहनास शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे.
पुर्वीच्या व्यवस्थापनाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे कारखान्यावर सुमारे १ हजार कोटींचे कर्ज आहे. या कर्जाच्या खाईतून आमदार पाटील हे कारखाना बाहेर काढुन शेतकऱ्यांची अर्थवाहिनी पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे आणि ही लवकरच पुर्ववत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा, यासाठी ही मिटींग आयोजित केलेली होती. परंतु आमच्या गावातील काही समाजकंटक कल्याण पिसाळ व केशव पिसाळ यांनी या मिटींगला विरोध केला व मिटींगमध्ये मराठा आंदोलन सुरू असल्याने राजकीय नेत्यांनी गावामध्ये येऊ नये असे जिल्हा बँकेचे चेअरमन व किसन वीर कारखान्याचे संचालक नितीन पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांना सांगितले.
वास्तविक पाहता सकल मराठा आंदोलन हे जरांगे पाटील यांनी गुरूवारी (दि. २) स्थगित केलेले होते. मराठा आंदोलनाशी कल्याण पिसाळ व केशव पिसाळ यांचा काडीमात्र संबंध नसून ते कधीही यात सहभागी नव्हते. त्यांना केवळ राजकीय स्टंटबाजी करण्याचा हेतु होता. तसेच कारखान्याच्या ऊस उत्पादकांची मिटींग ही राजकीय कार्यक्रम नसल्याने यामध्ये कसल्याही प्रकारचे राजकारण नव्हते. तसेच सध्या किसन वीर कारखान्याची उंचावत चाललेली प्रतिमाही त्यांना बघवत नसल्याने केवळ राजकीय आकसापोटी व आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसून येत आहे. केशव पिसाळ व कल्याण पिसाळ हे दोन्ही राजकीय पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांना गावामध्ये कटुता पसरविण्याचा हेतु असल्याचे स्पष्ट दिसून येते.
केशव पिसाळ यांना कारखान्याच्या हमीवर हार्वेस्टर मशीन घेतलेले होते. वास्तविक पाहता त्यांनी आपले मशीन किसन वीर कारखान्याकडे चालु करायला हवे होते. परंतु तसे न करता त्यांनी कारखान्यावर आमदार मकरंदआबा पाटील यांची सत्ता आल्यानंतर हे मशीन दुसऱ्या कारखान्याकडे चालविण्यासाठी दिलेले आहे. यावरून त्यांना कारखान्याविषयी किती आपुलकी आहे हे ही दिसून येते. त्यामुळे हा सर्व उठाटोप केलेला आहे तो केवळ आणि केवळ राजकीय आकसापोटी व प्रसिद्धीकरिता केलेला स्टंट आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही खाली सह्या करणार ओझर्डे येथील ग्रामस्थ या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवित आहे.
—————–
अॅड. उदयसिंह पिसाळ
विक्रमसिंह वि. पिसाळ
महेश व. पिसाळ
विजय न. तांगडे
बाळासाहेब वि. पिसाळ
राजेंद्र शि. निकम
सचिन आ. पिसाळ
लालासाहेब ज. पिसाळ
विजयसिंह न. पिसाळ
सुशांत अ. कामटे
विश्वजित ह. पिसाळ
आण्णासो ल. फरांदे
राजेंद्र ना. फरांदे













