Thu, Jan 15, 2026
सहकार सातारा जिल्हा

तरूणांनो इतिहास वाचा पण रमु नका, समजुन घेऊन भविष्याचा वेध घ्यावा – रामराजे नाईक-निंबाळकर

तरूणांनो इतिहास वाचा पण रमु नका, समजुन घेऊन भविष्याचा वेध घ्यावा – रामराजे नाईक-निंबाळकर
Ashok Ithape
  • PublishedSeptember 6, 2023

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे दिमाखात वितरण

वाई, दि. ६ सप्टेंबर २०२३

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी थोर स्वातंत्र्य सैनिकांनी जो लढा दिला, जो त्याग करून स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची किंमत तरूण पिढीला समजली पाहिजे. किसन वीरांनी ब्रिटीशांविरून जो लढा दिला, पत्री सरकारच्या लढयात त्यांची जी भूमिका होती तो खरोखरच अविस्मरणीय अशी होती. आजच्या तरुण पिढीने इतिहास वाचा पण इतिहासात रमु नका. इतिहास समजुन घ्या तसेच भविष्याचा वेध घ्या व ज्यांनी त्याग केला त्यांचे स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक- नाळकर यांनी केले.

भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराच्या वितरण ज्येष्ठ नेते, बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल व डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला.

त्यावेळी बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, प्रल्हादराव चव्हाण, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रामराजे निंबाळकर पुढे म्हणाले की, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात जी उत्तुंग भरारी घेऊन देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी आपली शिक्षण संस्थांचे जाळे उभे केलेले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला परंतु सर्वसामान्य माणसाची जी नाळ होती तीही कधी तोडली नाही. त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून वावरणारा कार्यकर्ता आज महापौर, आमदार, राज्यपाल पदापर्यंत मजल मारतो. तसेच शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी पाहून भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री हा किताब बहाल केलेला आहे. हा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यासाठी आमदार मकरंद आबांचा दूरध्वनी आला कि किसन वीरआबांच्या नावाचा पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील यांना तुमच्या हस्ते द्यायचा आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहू शकाल का ? त्यावर मी म्हणालो की, किसन वीर यांच्या नावाच्या पुरस्कारासाठी मी इतर कोणताही कार्यक्रम सोडून या समारंभास येणारच असं सांगितलं. किसन वीरांचे विस्मरण सातारा जिल्ह्याला कधीही होणार नाही. त्यांनी केलेलं कार्य हे चिरंतन लोकांच्या लक्षात राहणार आहे असेही श्री. निंबाळकर म्हणाले.

आमदार मकरंदआबा पाटील म्हणाले की, आजचे सन्मानमुर्ती पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव आमच्या संचालक मंडळाने या पुरस्कारासाठी निश्चित केल्यानंतर त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांचे वय पाहता ते येतील असे आम्हाला वाटत नव्हते किंबहुना त्यांच्यावतीने त्यांचा प्रतिनिधी येईल असे वाटले परंतु पाटील साहेबांनी सांगितले कि, किसन वीर आबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा मीच येऊन स्विकारणार यावरून किसन वीर आबांच्यावर आजही किती लोक प्रेम करतात हे यावरून दिसून येते. किसन वीर हात असतानादेखील त्यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा व्हायचा. विविध व्याख्याते, कार्यक्रमानी हा दिवस साजरा केला जायचा त्यांच्यानंतरही त्यांनी सातारा जिल्हयात विविध ठिकाणी जयंती साजरी करीत असत. परंतु किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन

लक्ष्मणराव पाटील यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तिस आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात यावे याकरिता हा पुरस्कार सुरू केला. तेव्हापासून किसन वीर कारखान्यावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. किसन वीर कारखान्याने मागील हंगामातील किसन वीर व खंडाळा कारखान्याची एफआरपीप्रमाणे सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकन्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. तसेच घेणाऱ्या हंगामातील सर्व कामे झालेली आहेत. आवश्यक असणारी ऊस तोडणी यंत्रणेचे करारही करण्यात आलेले आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपूर्ण उस किसन वीर कारखान्यालाच गाळपासाठी पाठवावा, असे आवाहनही आमदार पाटील यांनी यावेळी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भुरगुडे-पाटील यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. मानपत्राचे वाचन प्रा. अनिल बोधे यांनी केले,

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, रामदास इथापे, प्रकाश घुरगडे, संदिप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, श्रीकांत वीर, सत्यजित वीर, किकली येथील स्वातंत्र सैनिक निवृत्ती बाबर, खंडाळा कारखान्याचे संचालक दत्तात्रय ढमाळ, चंद्रकांत ढमाळ, एस. वाय. पवार, महादेव मस्कर, शशिकांत पवार, बाजार समितीचे चेअरमन मोहनराव जाधव, संचालक रमेश गायकवाड, पोपट जगताप, खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन भोसले, दिपक बाबर, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, निवास शिंदे, ज्ञानोबा शिंगटे, शिवाजीराव गायकवाड, बबनराव साबळे, युवराज पवार, प्रकाश पावशे, आत्माराम सोनावणे, सयाजी बाबर, विजयराव शिंगटे, नितीन निकम, अब्दुल इनामदार, अमृत गोळे, प्रकाश चव्हाण नानासाहेब शिंदे, तानाजी शिर्क, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!