Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा साहित्य

भालचंद्र मोने यांच्या ‘लोकमान्य टिळक आणि वाईकर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वाई येथे संपन्न.

भालचंद्र मोने यांच्या ‘लोकमान्य टिळक आणि वाईकर’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा वाई येथे संपन्न.
Ashok Ithape
  • PublishedAugust 28, 2023

‘लोकमान्य टिळक हे पहिले द्रष्टे नेते होते असे नव्हे तर ते येथे लोकशाही चालावी अशा मताचे नेते होते. भारतातील त्यावेळच्या काळात संस्कृती शिक्षण यावर इंग्रजांचा प्रभाव होता. तो पुसला जाणे आवश्यक असून येथे स्वातंत्र्य आहे असे लोकमान्यांचे मत होते. लोकमान्यांनी देशामध्ये अनेक लढे उभे केले. ते सुधारक होते आणि त्यांचे हे मत मानणारे लोक भारतामध्ये अभावाने त्यावेळी होते, असे मत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक, टिळक यांनी वाई येथील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या सभेत प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केले.

वाई / प्रतिनिधी दि. २७ ऑगस्ट :

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लो. टिळक स्मारक संस्थेचे अध्यक्ष अनिल जोशी होते. संस्थेचे संचालक श्री भालचंद्र मोने यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या ‘लोकमान्य टिळक आणि वाईकर’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी डॉ. दीपक टिळक वाई येथे आले होते. संस्थेचे संचालक डॉ शंतनू अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर अनिल जोशी यांच्या हस्ते डॉ. दीपक टिळक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक भालचंद्र मोने यांनी सुधीर क्षीरसागर, प्रशांत गुजर, मल्लाडे सर यांचा पुस्तक निर्मितीमध्ये सहकार्य केल्याबद्दल सन्मान केला.

टिळक यांच्या ध्येय-उद्दिष्टांसंबंधात बोलताना डॉ. दीपक टिळक म्हणाले “लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य हे मूल्य मानले, ते संशोधक होते, क्रांतीकारक होते, परंतु त्यांच्या क्रांतिकार्याचा सुगावा इंग्रजांना लागला नाही. लोकमान्य टिळक यांनी महत्त्वाची कामे म्हणजे त्यांनी तरुण कार्यकत्यांना सांभाळले, धर्म मानणाऱ्यांना सांभाळले, सामान्य जनता सुशिक्षित व्हावी म्हणून शिक्षण संस्थांची निर्मिती केली. वयाच्या २४ व्या वर्षी लोकमान्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि आपले उर्वरित आयुष्य देशासाठी खर्च करण्याची भूमिका बजावली.

देव आणि देशकार्य एकच आहे असे लोकमान्यांचे मत होते. लोकमान्यांचे वेगळेपण सांगताना डॉ. दीपक टिळक लोकमान्यांनी आपले लक्ष चौफेरपणे गुंतवले होते. गीतारहस्याची निर्मिती झाल्यानंतर लोकमान्य टिळक यांनी ‘होमरूल चळवळ सुरू केली एवढेच नव्हे तर केसरीच्या माध्यमातून “काल मार्क्स” पहिल्यांदा त्यांनी समजावून सांगितला. लोकमान्यांची त्यावेळची ओळख अनसंग सायंटिस्ट अशी होती. त्यांचा द्रष्टेपणा त्यावेळच्या नेत्यांमध्ये फार अभावाने माहित होता. टिळक हे व्यवहारिक होते आणि विज्ञानवादी होते एवढेच नव्हे तर ते युगप्रवर्तक होते. व्यवहार आणि वास्तविकता यांची सांगड घालण्याची दृष्टी लोकमान्यांची होती. असे मत डॉ. दीपक टिळक यांनी व्यक्त केले

“लोकमान्य टिळकांनी आणि वाईकर” या पुस्तकाची माहिती देताना भालचंद्र मोने म्हणाले अनेक वर्षांच्या संशोधनानंतर माझ्या या पुस्तकाची झाली आहे. वाईतील विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकमान्यांच्या कार्याने व विचाराने प्रभावित झालेले २८ क्रांतीकारक वाईमध्ये होते हे माझ्या लक्षात आले. वाई शहराचा इतिहास अनेक क्रांतिकारकांच्या धाडसी कर्तृत्वाने भरलेला आहे. या सर्वांची ओळख ‘लोकमान्य टिळक आणि वाईकर या पुस्तकाच्या माध्यमातून मी साधार स्पष्ट केली आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल जोशी म्हणाले ‘वाई शहरातील असंख्य कार्यकर्ते व क्रांतिकारक हे मतांशी सहमत होते असे नाही, तरीदेखील लोकमान्यांच्या चरित्राबद्दल व कार्याबद्दल या सर्वांना प्रचंड आदर होता. यामध्ये ज्ञानप्रकाशचे व्यवहारिक संपादक बापुजी मार्तंड आंबेकर व काशिनाथ शास्त्री तथा भाऊ शास्त्री लेले यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. यांचे लोकमान्यांशी मतभेद होते पण त्यांचे मनभेद कधीही नव्हते”.

संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. मेधा साळवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!