Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

सामाजिक स्थानिक बातम्या

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भुईंज येथे महास्वच्छता अभियान.

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भुईंज येथे महास्वच्छता अभियान.
Ashok Ithape
  • PublishedAugust 27, 2023

भुईंज, २७ ऑगस्ट २०२३ :

आज संपूर्ण भुईंज गाव स्वच्छ करण्यात आले, त्याची सुरुवात भुईंज बस स्थानक परिसर,उड्डाणपूल,बाजारपेठ,येथून करण्यात आली. महाराष्ट्र भूषण तिर्थरूप डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून हे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे आदर्श, निरोगी आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी नेहमी सक्रिय असते, सातत्याने त्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये रक्तदान शिबिर, जलसंधारण, जलयुक्त शिवार पासून अनेक उपक्रमांचा समावेश आहे. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सामाजिक योगदान अभूतपूर्व आहे.

यावेळी भुईंज ग्रामपंचायतीचे उपसरपंच शुभम पवार यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रक्तदान शिबिर महाशिबिर म्हणून यशस्वी करण्यासाठी संकल्प उपसरपंच शुभम पवार यांचा दृढनिश्चिय या संप्रदाय व प्रतिष्ठानचे जेष्ट सेवेकरी,मार्गदर्शक राजाभाऊ गाडे यांनी यावेळी श्री सदस्यांनी मोठे रक्तदान शिभीर घेण्यासाठी उपसरपंच शुभम पवार यांना सांगितले यावर उपसरपंच पवार यांनी भुईंज ग्रामस्थ,ग्रामपंचायत यांच्या बरोबर सर्व क्रीडा मंडळ,सेवाभावी संस्था विशेष करून युवकांचा सहभाग घेऊन हे शिबिर महाशिबीर म्हणून यशस्वी करू असा संकल्प केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!