११ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत पसरणीच्या किर्णाक्षी येवलेची सुवर्णकामगिरी
वाई I प्रतिनिधी : इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन व महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या संयुक्त विधमानाने ११ वी राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट नाशिक येथे ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत पसरणी ता वाई येथील किरनाक्षी येवले हिने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवले तिचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
या स्पर्धेत एकूण २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश तसेच ऑल इंडीया पोलीस, सी आय एस एफ, आय टी बी पी, एस एस बी संघ असे एकूण ९०० खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम खासदार मा.श्री. हेमंत गोडसे, नितीनजी ठाकरे, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले, खजिनदार. इरफान भुट्टो, प्रतिभाताई पवार मा नगरसेवका, तृप्ती बनसोडे या मान्यवरांच्या हस्ते पार पडला
पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा क्रीडा प्रकार आहे. टेडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काता), रेगु (ग्रुप काता), गंडा (डेमो फाईट), सोलो (इव्हेंट) अशा पाच प्रकारांमध्ये हा खेळ खेळला जातो.
१ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आपल्या ५ टक्के राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय विश्वविदयालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड आणि ऑलिम्पिक, काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट गेम, युथ गेम व ऐशियन बिच गेम, भारतीय विश्वविद्यालय, खेळ खेलो इंडिया वुमन्स पिंच्याक सिलॅट लिग अशा अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुज सरनाईक अंशुल कांबळे वैभव काळे, नागेश बनसोडे, आकाश धबाडगे, योगेश पानप याचे सहकार्य मिळाले.













