बसच्या चाकाखाली येऊन तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू – वाई आगारातील घटना
वाई / प्रतिनिधी दि.१२ : वाई बस स्थानकावर आज दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली येऊन सुलतानपुर येथील १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार झाली. मुलीचे नाव श्रावणी विकास अहिवळे (रा. सुलतानपूर, ता. वाई, ) असून ती त. ल. जोशी विद्यालयात इयत्ता ७ वी मध्ये शिकत होती.
वाई बालेघर गाडी क्र.एम एच १४ बी टी ०४९६ ही बस बसस्थानकावर प्लॅटफॉर्म ला लागत असताना गाडीमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी श्रावणी अहिवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले गेले.
यामुळे बसस्थाणकावर खळबळ उडाली. तसेच बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक जीवन मारुती भोसले राहणार नांदवळ वय 36 याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.













