प्रत्येकानेच मिळालेल्या संधीचे सोने करावे – शिरीष चिटणीस
![]()
परदेशी शिक्षणासाठी निवड झालेल्या डॉ. शिवानी कदम हिचा लोकमंगल तर्फे सत्कार समारंभ संपन्न.
सातारा / प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या अंगी शालेय जीवनापासूनच महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर प्रत्येकाने जीवनात मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे, असे प्रतिपादन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.
सातारा औद्योगिक वसाहतीमधील लोकमंगल हायस्कूल येथे डॉ. शिवानी कदम हिची परदेशी शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तिच्या सत्कार समारंभात शिरीष चिटणीस बोलत होते. यावेळी शिवाजी कदम, सोनल कदम, उद्योजक प्रमोद धुमाळ, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा निकम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
चिटणीस पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी चांगले कार्य करून शाळेचे व पालकांचे नाव मोठे केले पाहिजे याच्यातूनच तो विद्यार्थी मोठा माणूस होतो. डॉ. शिवानी ही सामान्य कुटुंबातील असून तिने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. शालेय जीवनात वाचनाची आवड निर्माण झाल्यास संस्कारशील नागरिक बनण्यास मदत होत असते.
शिवाजी कदम म्हणाले, प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. जीवनात पुढे जाण्यासाठी वेगळे काही करायचे आहे. यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. कोणत्याही गोष्टीचे सातत्य ठेवल्यास अशक्य गोष्टही शक्य करता येते.
प्रमोद धुमाळ म्हणाले, प्रयत्न करून पुढे गेल्यास जीवनात यश मिळत असते. अभ्यासात सातत्य असणे गरजेचे आहे. लोकांसाठी चांगले काम केल्यास त्याचाही फायदा आपल्याला निश्चितच मिळतो.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा निकम म्हणाल्या, परदेशी शिक्षणाचा प्रवास सोपा नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. जीवनात आपल्या मित्र-मैत्रिणी सुद्धा चांगल्या पाहिजेत. मुलींसाठी सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत या क्षेत्रांचा अभ्यास करून आपण वेगवेगळ्या क्षेत्राची निवड करू शकतो. शिवानी कदम ही सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी असून ती आपल्या पालकांचे नाव निश्चितच उज्वल करेल.
कार्यक्रमास विजय यादव, उदय जाधव, संगीता कुंभार, बाळकृष्ण इंगळे, अभिजीत वाईकर, सतीश पवार, यश शीलवंत, विजय गव्हाळे, चंद्रकांत देवगड, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा वाघमोडे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार गुलाब पठाण यांनी मानले.













