प्रशासकीय इमारतीच्या परिसराची अधिकारी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता
सातारा दि. 11 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तसेच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचा-यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, कृषी विभागाच्या लेखाधिकारी सीतल करंजेकर, सहायक निबंधक जनार्दन शिंदे, सहायक निबंधक उमेश उंबरदंड यांच्यासह इमारतीमधील कृषी विभाग, सहकार विभाग, कौटूंबिक न्यायालय, आत्मा कार्यालय, महिला बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने इमारतीच्या परिसराची स्वच्छता केली.













