विनामूल्य खेळाडू घडवणारे बावधनचे क्रीडा प्रशिक्षक शिवाजी भोसले
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या बावधन गावाचा लौकिक महाराष्ट्रात दरवळतो आहे या गावात कर्मयोगींची कमी नाही अनेक ज्ञात अज्ञात रत्ने आहेत की नकळत हिऱ्यांना पैलू पाडण्याचे कार्य करीत आहेत.
असाच एक महाराजांच्या नावाचे साम्य असणारा बावधनचा आधुनिक शिवाजी भोसले हे अल्पभूधारक शेतकरी शाळेतील व शाळाबाह्य मुला मुलींना दररोज विविध खेळांचे धडे प्रात्यक्षिक देऊन खेळाडू तयार करत आहेत शिवाजी काशिनाथ भोसले यांना शालेय जीवनापासून खेळाची आवड होती.
प्रत्येक खेळात शिवाजी यांनी कौशल्य प्राविण्य मिळवून तरबेज झाले बेताच्या परिस्थितीमुळे खेळाकडे दुर्लक्ष करून घरच्या थोड्याफार शेतीत रमले पण अंगातील खेळाडू गप्प बसत नव्हता म्हणून थोरली विहिरीतील भोसले तालीमित खेळाडूंना मल्लखांबाचे शिक्षण दिले बावधन हायस्कूल येथे दोन वर्ष मुलांना विना मोबदला विविध खेळांचे प्रशिक्षण दिले.
आता ते प्राथमिक शाळेत दररोज दुपारी दोन ते पाच वेळात मुला मुलींना पळणे खो खो मल्लखांब कबड्डी रिले लांब उडी उंच उडी मैदानी खेळाचे विना मोबदला सराव करून घेतात गावातील व शाळेतील मुला-मुलीत चैतन्य निर्माण झाले असून मुलांना खेळाची गोडी लागली आहे मुले आवडीच्या खेळात प्रवीण मिळवत आहेत मुलांना मैदानात खेळताना पाहून पालक शिक्षकांना समाधान वाटत आहे शिवाजी भोसले यांनाही खेळाडू घडवत असल्याचे समाधान मिळत आहे असे गुरुवर्य शाळाबाह्य क्रीडा शिक्षक क्रीडा महर्षी क्रीडाप्रेमी शिवाजी भोसले यांना मानाचा मुजरा
दिलीप कांबळे, बावधन













