Tue, Oct 27, 2026
सहकार

नामदार मकरंदआबांनी केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड – प्रमोद शिंदे

नामदार मकरंदआबांनी केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड – प्रमोद शिंदे
Ashok Ithape
  • PublishedOctober 24, 2026

‘किसन वीर’ च्या सभासद, बिगर सभासदांना मिळणार साखर

भुईंज : दि. २४ : किसन वीर साखर कारखान्याच्या बॉयलर अग्रि प्रदिपन समारंभात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी शेतकन्यांना दिलेल्या शब्दानुसार मंगळवार (दि.२७) पासुन किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. नामदार मकरंदआबांनी कारखान्याकडुन जवळपास ८ वर्षांपासन बंद पडलेली साखर वाटपाची सुरूवात करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली असल्याचे व्हार्ईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांना अनुक्रमे ज्या सभासदांचा ऊस आलेला आहे त्यांना १० किलो व ज्यांचा ऊस आलेला नाही अशा सभासदांना ५ किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या बिगर सभासदांचा ऊस गळितासाठी आलेला आहे, त्यांना ५ किलो साखर मिळणार आहे. या साखरेचा दर २० रूपये प्रतिकिलो राहणार आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड किंवा आधारकार्ड व त्याची झेरॉक्स आणणे गरजेचे आहे, त्याशिवाय साखर मिळणार नाही, असेही सांगण्यात आलेले आहे. साखर वाटपाची वेळ सकाळी ९ पासन सायंकाळी ४ वाजेपर्यत संबंधित गट ऑफिसला करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या गट ऑफिस किंवा शेती कर्मचाऱ्यांशी संपर्क साधुन आपली साखर कोणत्या ठिकाणी वितरीत केली जाणार आहे, याची माहिती घ्यावी. सभासदांना साखर घेण्यासाठी त्रास होणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाने घेतलेली असुन आपल्या जवळच्या ठिकाणीच साखर वाटपाचे नियोजन केले असल्याचे सांगितले. बंद पडलेले साखर वाटप पुन्हा सुरू होत असल्याचे पाहुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत आहेत. किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी श्री. शिंदे यांनी केले असुन नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील व व्यवस्थापनाच्यावतीने सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!