Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

महाराष्ट्र

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली
Ashok Ithape
  • PublishedMarch 5, 2026

पुणे, दि. ५ (जिमाका वृत्तसेवा) – विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे विभागीय अधीस्वीकृति समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार आणि माध्यम क्षेत्रासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थित सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय उपसंचालक डॉ. किरण मोघे, सदस्य ज्येष्ठ पत्रकार सुनीत भावे, गोरख तावरे, चंद्रशेन जाधव, पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तसेच सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!