Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँ साहेबांना अभिवादन

पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँ साहेबांना अभिवादन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 13, 2026

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार ;

सिंदखेडराजा, दि. १२: राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी असून या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखडा नव्याने तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्रमांक ७ येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

याप्रसंगी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील,महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, उद्योजक दयानंद भोसले, अॅड नाझेर काझी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!