Thu, Jan 15, 2026
क्रीडा

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे व अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे व अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड
Ashok Ithape
  • PublishedJanuary 3, 2026

सातारा | प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिशा मिळणार असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात सुरू आहे.

अपुर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित व तरुण उद्योजक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील उदयोन्मुख युवक-युवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेषतः कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, स्थानिक स्तरावर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सुविधा व स्पर्धा वाढाव्यात, यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. या निवडीमुळे कोकणातील युवा शक्तीला चालना मिळून महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीला गती मिळेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो ओळ : १ ) छ. संभाजी राजे २) अपुर्वा सामंत

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!