Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedDecember 27, 2025
सातारा दि. 26 :   भारत देश शेतीप्रधान असल्याने देशाची  आर्थिक स्थिती  शेतीवरच अवलंबून आहे.  शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील उत्पन्न दुप्पट करावे.  आपल्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीतही हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कृषी विभाग व शेती उत्पन्न बाजार समिती, कराड यांचे संयुक्त विद्यमाने स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला (बैल बाजार) आवार, शेती उत्पन्न बाजार समिती, कराड येथे 26 ते 30  डिसेंबर या कालावधीत स्व्. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व  जिल्हा कृषी महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. याचे उद्घाटन  पालकमंत्री श्री. देसाई  यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील,   कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उदयसिंह पाटील उंडाळकर,विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे उपस्थित होते.
स्व. विलास पाटील उंडाळकर यांनी दूरदृष्टी ठेवून कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या प्रदर्शनाचा सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. दरवर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा.
शेतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर केलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदानावर शेती अवजारे दिले आहेत. शेतकरी सबळ झाला तर देश ही सबळ होईल असा विश्वासही पालकमंत्री श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
खासदार श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापराबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नफ्यातून दोन कोटी या
 ठेवले आहेत. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 2 हजार शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बारामती कृषी विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यमातून शेताला  पाणी, खत किती द्यावे तसेच वातावरणातील बदलाची माहिती ही रोजच्या रोज दिली जाते. तरी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर करून आर्थिक प्रगती करावी,असे आवाहनही  यांनी केले
या कार्यक्रमास प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, उपजिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रिक, तहसीलदार कल्पना ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी तसेच कराड पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!