डॉ.अनिरुद्ध बारगजे यांची CDE समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
![]()
६४ व्या महाराष्ट्र राज्य दंत परिषदेत नवीन कार्यकारिणी जाहीर
वाई, दि. १५ : येथील सुप्रसिध्द दंतचिकित्सक डॉ. अनिरुद्ध बारगजे यांची महाराष्ट्र राज्य दंत परिषदेमध्ये राज्यशाखेच्या उत्कृष्टता केंद्र व सतत दंत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली.
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य दंत परिषदेमध्ये राज्य संघटनेची सन २०२५–२६ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या परिषदेत डॉ. अनिरुद्ध बारगजे यांची राज्यशाखेच्या उत्कृष्टता केंद्र व सतत दंत शिक्षण समितीच्या समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी डॉ. अशोक ढोबळे (एच.एस.जी.), डॉ. विकास पाटील (एस.एस.), तसेच माजी राज्याध्यक्ष डॉ. बजरंग शिंदे, सन २०२६-२७ चे राज्याध्यक्ष डाॅ. श्रीनिवास अष्टेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच आय.डी.ए. कराड शाखेचे पदाधिकारी व शाखेचे सदस्य, डॉ. श्रेयांस सनकी-जैन, डॉ. पराग सपकाळ व इतर सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
यावेळी झालेल्या सत्कार समारंभात नवनिर्वाचित राज्याध्यक्ष डॉ. फिरोज शरीफ व डेंटल डायलॉगचे संपादक डॉ. रतिन दास यांच्या हस्ते डॉ. अनिरुद्ध बारगजे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्यातील दंत क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.













