Thu, Jan 15, 2026
क्रीडा

सातारा जिल्हा ‘स्पोर्टिका श्री’ बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न

सातारा जिल्हा ‘स्पोर्टिका श्री’ बॉडी बिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedDecember 15, 2025

वाई प्रतिनिधी | दि. १४ : सातारा जिल्ह्यातील बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘स्पोर्टिका श्री’ बॉडी बिल्डिंग स्पर्धा वाई येथील बाजार समिती हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. स्पोर्टिका फिटनेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य स्पर्धेत जिल्हाभरातील अनेक नामवंत व नवोदित शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला.

स्पर्धकांनी आपापल्या वजनी गटात उत्कृष्ट शरीरप्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. शरीरसौष्ठवासाठी आवश्यक असलेली शिस्त, सातत्यपूर्ण मेहनत व समर्पण प्रत्येक स्पर्धकाच्या देहयष्टीतून ठळकपणे दिसून आले. या स्पर्धेसाठी राज्यभरातील अनुभवी परीक्षक उपस्थित होते. राजेंद्र हेंद्रे, मिथिल भंडारे, अनिल फुले, मुरली वत्स, अजित सांडगे व धनंजय चौगुले यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेप्रसंगी बाजार समितीचे संचालक तुकाराम जेधे, उद्योजक संतोष शिंदे, राजेंद्र शिर्के, सोमनाथ देवकुळे, सतिश पिसाळ तसेच नवी मुंबईचे उद्योजक शंकर मालुसरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्पर्धेस उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. युवकांना शरीरसौष्ठव क्षेत्रात योग्य दिशा व मार्गदर्शन देण्याचे कार्य ते सातत्याने करत असून, त्यांना संजय मालुसरे यांची मोलाची साथ लाभत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

‘स्पोर्टिका श्री’ स्पर्धेमुळे सातारा जिल्ह्याला शरीरसौष्ठवाच्या क्षेत्रात नवी ओळख मिळत असून, अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात गेल्या दोन वर्षांपासून दिलेल्या योगदानाची दखल घेत संजय चंद्रकांत मालुसरे यांची सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व वाई तालुका शरीरसौष्ठव संघटना यांच्याकडून जिल्हा पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली.

स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :

स्पोर्टिका श्री २०२५ – नवोदित गट :
प्रथम – यश नायकवडी,
द्वितीय – किरण पोळ,
तृतीय – अयान खान,
चतुर्थ – साहिल थोरवे,
पंचम – संजय शिंदे,
षष्ठ – अनिकेत भिलारे.

स्पोर्टिका श्री २०२५ – मेन्स फिजिक्स कॅटेगरी :
प्रथम – सुलेमान मोमिन (कराड),
द्वितीय – आकाश देसाई (कराड),
तृतीय – सुरज भोसले (फलटण),
चतुर्थ – नितीन भोसले (वाई),
पंचम – प्रशांत फणसे (फलटण),
षष्ठ – अनिस शेख (सातारा).

स्पोर्टिका श्री २०२५ – टॉप १५ बॉडी बिल्डिंग :
शंतनु येवले (वाई), राहुल कुसाळकर (फलटण), संजय मोरे (फलटण), अनिरुद्ध पवार (वाई), संतोष वाडेकर (शिरवळ), यश नायकवडी (वाई), रोहित गजरे (कराड), सतीश वाडकर (सातारा), विश्वजित देशमुख (वाई), अजिंक्य महामुनी (वाई), दिनेश पिसाळ (फलटण), गणेश वैरागी (कराड), विनीत नेमाडे (वाई), अभिजित चव्हाण (कोरेगाव) व उदय शिंदे (वाई) यांनी यश संपादन केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी, परीक्षक व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!