देगाव विकास सोसायटीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न
![]()
सभासदांच्या सुविधांसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारणार ; रामदास इथापे
देगाव | प्रतिनिधी :
देगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड देगाव यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ भूमिपूजन समारंभाने मोठ्या उत्साहात पार पडला. किसनवीर, सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास इथापे यांच्या हस्ते या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास ना.मकरंद पाटील नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष विजय इथापे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष योगेश इथापे, सरपंच सुरज पिसाळ, उपसरपंच प्रकाश इथापे यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना संचालक रामदास इथापे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून देगाव सोसायटी सभासदांच्या विश्वासावर कार्यरत आहे. नव्या संकुलामुळे सभासदांना अद्ययावत सुविधा मिळणार असून ही इमारत शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आधार बनेल. सभासदांच्या हितासाठी हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल.”
या नवीन इमारतीत सभासदांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून सोसायटीच्या सर्व कामकाजाला अधिक वेग व पारदर्शकता मिळणार आहे. या प्रसंगी गावातील शेतकरी सभासद, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: देगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी भूमिपूजन करताना मान्यवर — सोबत पदाधिकारी व ग्रामस्थ.













