Thu, Jan 15, 2026
सामाजिक

स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान व स्पंदन हेल्थकेअरकडून वाईत सामाजिक सेवा पर्व

स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान व स्पंदन हेल्थकेअरकडून वाईत सामाजिक सेवा पर्व
Ashok Ithape
  • PublishedDecember 5, 2025

तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर व आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

वाई, दि.५  : येथील स्व. दत्तात्रय पांडुरंग मेनबुदले स्मृती प्रतिष्ठान व स्पंदन हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी दि. ६ डिसेंबर रोजी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी रक्तदान शिबिर, तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा तसेच सायंकाळी आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे.

सकाळी ९.३० वाजता यशवंतनगर येथील आशा वृद्धाश्रम, वाई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी श्री. विजयकुमार परीट व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

याच दिवशी तालुकास्तरीय बाल चित्रकला स्पर्धा व तिचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री. हर्षवर्धन मोरे व विस्ताराधिकारी श्री. साईनाथ वाळेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रभावी वक्ते व कथाकथनकार श्री. संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत मठ संस्थानचे मठाधिपती श्री. ज्ञान भास्कर महादेव शिवाचार्य वाईकर महाराज राहणार आहेत.

सायंकाळी आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा ३.३०  वाजता साठे मंगल कार्यालय, वाई येथे होणार असून या सोहळ्यात श्री. अरुण सर्जेराव बाबर व श्री. तुषार अरुण बाबर, तसेच सौ. संगीता शिवराम मराठे, श्री. अशोक शिवराम मराठे व कु. श्रद्धा अशोक मराठे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी – शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस निरीक्षक गडहिंग्लज कोल्हापूर अजयकुमार सिंदकर, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी, आरोग्यजागृती व विद्यार्थ्यांमध्ये कला व संस्कारांची जोपासना होण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!