Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

‘घाटूबाई’च्या आशीर्वादाने राजश्री सणस बाजी मारणार

‘घाटूबाई’च्या आशीर्वादाने राजश्री सणस बाजी मारणार
Ashok Ithape
  • PublishedNovember 27, 2025

पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्र. १ (ब) मधून महिला नगरसेविका पदासाठी उभ्या असलेल्या श्रीमती सणस राजश्री अजय यांनी आपला ‘जनतेचा आवाज, विकासाचे वचन!’ हा नारा देत, आपल्या मागील अनुभवाच्या जोरावर आणि प्रशासकीय कौशल्याच्या बळावर त्या वार्ड क्र. १ ला ‘आदर्श वार्ड’ बनवण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.त्यांच्या प्रभागात येणाऱ्या घाटजाई देवीच्या आशीर्वादाने राजश्री सणस निवडणूकीत बाजी मारणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

श्रीमती राजश्री सणस यांनी २००६ ते २०११ या काळात नगरसेविका म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांपासून त्यांनी पांचगणी नगरपालिकेत शासकीय पदावर काम केले आहे. या दुहेरी अनुभवामुळे त्यांना पालिकेच्या कार्यप्रणालीची सखोल माहिती आहे. “राज्यशासनाच्या विविध विभागांशी माझा थेट परिचय असल्याने विकास निधी आणि अनुदान आणण्यास मला कोणतीही अडचण येणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ना.मकरंद पाटील, स्थानिक नेते,आणि सहकारी सदस्यांच्या सहकार्याने मोठा विकास निधी आणून वार्ड क्र. १ चा चेहरामोहरा बदलण्यासाठी सणस सज्ज झाल्या आहेत.

राजश्री अजय सणस यांना ‘छत्री’ या चिन्हाला प्रभाग क्रमांक एक मध्ये निर्णायक प्रतिसाद मिळत असून मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे. आपल्या ‘घर टू घर’ प्रचारात त्यांना मतदारांनी आपलेसे केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!