Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

शेखर कासुर्डे आणि परवीन मेमन यांच्या विजयासाठी घाटजाईदेवीला साकडे

शेखर कासुर्डे आणि परवीन मेमन यांच्या विजयासाठी घाटजाईदेवीला साकडे
Ashok Ithape
  • PublishedNovember 27, 2025

पाचगणी l प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ४ अ च्या उमेदवार सौ.परवीन मेमन आणि ब चे उमेदवार शेखर कासुर्डे यांच्या विजयासाठी पाचगणीचे ग्रामदैवत घाटजाईदेवीला नागरिकांनी साकडे घातले आहे. सौ.मेमन यांच्या ‘एअर कंडीशनर’ आणि कासुर्डे यांच्या ‘छत्री’ या चिन्हाचा प्रभाग क्रमांक एक मध्ये जागर होत आहे.

पाचगणी नगरपालिकेतील ‘क्लिन इमेज’ असणाऱ्या सौ.मेमन यांनी कायमच पाचगणीच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम दिला. शेखर कासुर्डे यांनी ना.मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पाचगणी शहराला विकासाची निश्चित दिशा दिली आहे. पाचगणीच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी कासुर्डे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी कंबर कसली आहे.

प्रभाग क्रमांक चार मध्ये सौ.मेमन यांच्या ‘एअर कंडीशनर’ आणि कासुर्डे यांच्या ‘छत्री’ च्या विजयासाठी तरुण, महिला आणि वयोवृद्धांनी कंबर कसली असून बहुमताने विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!