“वाईचा धावता उत्सव : सहाव्या हाफ मॅरेथॉनला २५००+ धावपटूंची गर्दी”
वाई, दि. २४ : वाई हाफ मॅरेथॉनच्या सहाव्या पर्वाला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निसर्ग प्रेम, आरोग्य आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेत २५०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवत शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशन व टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे उत्तम आयोजन करण्यात आले.
गरवारे टेक्निकल फायबर्स लि. संचालिका मयुरी वायू गरवारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, प्रबोध कामत, एच.आर. विभाग प्रमुख रावेंद्र मिश्रा, उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात, दिशा अकॅडमी प्रमुख नितीन कदम, उद्योजक उमेश गुजर, चंदू मातारे, स्वप्निल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मयुरी गरवारे म्हणाल्या की, “गरवारे कंपनीचे वाई शहराशी कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. सलग सहाव्या वर्षी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करून टीम वाईने वाईचा लौकिक वाढवला आहे. आगामी काळात या मॅरेथॉनचे स्वरूप अधिक भव्य व्हावे, अशी आमची इच्छा आहे.”
तसेच गरवारे कंपनीचे या वर्षी ५० वे वर्ष आणि वाईत कार्याला ३० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख करत त्यांनी वाईकरांच्या आरोग्य चळवळीत गरवारे परिवार पुढेही योगदान देत राहील, असे सांगितले.
वाई स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक ओसवाल म्हणाले, “स्थानिक लोकांनी सुरू केलेली ही स्पर्धा आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे. आरोग्य आणि आनंदासाठी धावणाऱ्या वाईकरांच्या सहकार्यामुळे दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढत आहे. यंदा ही संख्या २५०० वर पोहोचली आहे.”
नितीन कदम यांनीही सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने घेतलेली झेप कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.
उत्कृष्ट आयोजनाची सर्वत्र प्रशंसा
सुंदर नियोजन, मार्गावरील भक्कम सपोर्ट तसेच झुंबा वॉर्मअप सत्रामुळे धावपटूंमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. धावपटूंनी आयोजकांच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक केले.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्वागताची जबाबदारी दीपक ओसवाल, धोंडीराम वाडकर, समीर पवार, राजगुरू कोचळे यांनी निभावली. सूत्रसंचालन सुधीर जमदाडे व जितेंद्र शिर्के यांनी केले, तर रेस डायरेक्टर विलास माळी यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते
२१ किमी
१८–३४ पुरुष : १) नागेश कारंडे, २) स्वप्निल कोचळे, ३) सार्थक काळे
१८–३४ महिला : १) संतोषी नराळे, २) शिवाणी चौरशिया, ३) पुजा महामुलकर
३५–४४ पुरुष : १) महेश यादव, २) अमोल यादव, ३) विक्रम वैयती
३५–५५ महिला : १) सोनिया प्रमाणीक, २) स्मिता शिंदे, ३) दीपाली किर्दत
४५–५४ पुरुष : १) सचिन निकम, २) रविंद्र जगदाळे, ३) संचिस देवी
४५–५४ महिला : १) अस्लम मुलाणी, २) स्मिता अडसूळ, ३) मनिषा कुटवळ
५५ वर्षांवरील पुरुष : १) अजय भैताडे, २) सुनील पानसे, ३) अर्जुन भिंगारे
५५ वर्षांवरील महिला : १) संगीता उबाळे
१० किमी
१२–१७ पुरुष : १) संकेत पोळ, २) विराज शिंदे, ३) अजय भाणसे
१२–१७ महिला : १) प्रणाली पवार, २) तेजल शिर्के, ३) श्रावणी मांढरे
१८–३४ पुरुष : १) अभिनंदन सूर्यवंशी, २) अभिषेक देवकाते, ३) अर्जुन लवटे
१८–३४ महिला : १) साक्षी जदयाल, २) निकिता भिलारे, ३) शिवानी खामकर
३५–४० महिला : १) मिनाज नदाफ, २) विनया गुजर, ३) शितल रासकर
३५–४४ पुरुष : १) मल्लिकार्जुन पारडे, २) योगेश जाधव, ३) अनशुमन जगदाळे
४५–५४ पुरुष : १) रणजीत कनबरकर, २) जयंत शिवदे, ३) अरविंद नलावडे
४५–५४ महिला : १) माधुरी शिवदे, २) सुनिता आरगाडे, ३) नंदा शिंदे
५५ वर्षांवरील पुरुष : १) विठ्ठल आरगाडे, २) जॉर्ज थॉमस, ३) अतुल बांदिबडेकर
५५ वर्षांवरील महिला : १) कांताबाई खडसरे, २) एकता अवचर, ३) दीप्ती मखवाना
वाई शहरातील आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारी ही हाफ मॅरेथॉन यंदाही उत्साहात पार पडली. वाढता सहभाग आणि उत्तम आयोजनामुळे ही स्पर्धा पुढील वर्षी आणखी भव्य होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
फाेटाे : विजेत्यांना पाेरिताेषिक देताना मयुरी गरवारे शेजारी विवेक कुलकर्णी, प्रबाेध कामत, रावेंद्र मिश्रा, अरविंद कुलकर्णी, युवराज थाेरात, दिपक आेसवाल, उमेश गुजर













