प्रा. संभाजी लावंड यांच्या ‘वलाफोक’ कथासंग्रहास पलपब साहित्यपीठ पुरस्कार प्रदान
वाई l प्रतिनिधी : मराठी विषयाचे निवृत्त प्राध्यापक व खातगुण, ता. खटाव येथील मूळ रहिवाशी प्रा. संभाजी लावंड यांच्या “वलाफोक” या कथासंग्रहास साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा पलपब साहित्यपीठ पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला.
ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन, पुणे व पलपब पब्लिकेशन अहमदाबाद (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यामाने पुण्यातील खडकी येथे महर्षी वाल्मिकी ग्रंथालयात ‘जुळती मनाची स्पंदने..’ हे राज्यस्तरीय कवी संमेलन लीनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच दि. ९ नोव्हेंबर २५रोजी संपन्न झाले. त्यात ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक संभाजी लावंड यांच्या “वलाफोक” या कथासंग्रहास शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन संपूर्ण राज्यभरातून आलेल्या कवी लेखकांच्या उपस्थि तीत गौरविण्यात आले.
ज्येष्ठ दिवंगत साहित्य पु. ल. देशपांडे यांचे नातू अमोल नाडकर्णी, दूरसंचारचे माजी सहाय्यक महाप्रबंधक पु. ना. बारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक व बालसाहित्यिक, कवी अरुण वि. देशपांडे होते, तर जेष्ठ लेखक व कराडच्या टिळक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून हा
कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. चौधरी यांनी केले, तर सुरक्षाताई यांनी आभार प्रदर्शन केले. वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पलपब साहित्यपीठ पुरस्काराने झालेल्या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. डॉ. संभाजी लावंड यांचे अभिनंदन केले. यापूर्वी प्रा. लावंड यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली असून “सहज संवाद” हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.













