Thu, Jan 15, 2026
शिक्षण

अखिल भारतीय सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रीयेस ९ नोंव्हेबर पर्यंत मुदतवाढ

अखिल भारतीय सैनिक स्कूलच्या प्रवेश प्रक्रीयेस ९ नोंव्हेबर पर्यंत मुदतवाढ
Ashok Ithape
  • PublishedNovember 8, 2025

सातारा, दि. 7 : शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या इयत्ता सहावी व इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2025 प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरणे सुरू झाले आहे इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला मुलींना सुवर्णसंधी आहे. याकरिता विद्यार्थ्यांचे वय दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत 10 ते 12 वर्ष असावे. तर इयत्ता नववी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिता दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत त्या विद्यार्थ्यांचे वय 13 ते 15 या दरम्यान असावे, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची दिनांक 10 ऑक्टोबर ते ९ नोंव्हेबर २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेश फॉर्म ऑनलाइन भरावेत तसेच कोणत्याही प्रकारच्या शंका अगर अडचणी असतील तर आपण https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ या संकेत स्थळाला भेट द्यावी. आपल्या पाल्याचा प्रवेश परीक्षेचा फॉर्म लवकरात लवकर भरावा या सुवर्णसंधीचा फायदा जास्तीत जास्त पालकांनी घ्यावा असे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!