साताऱ्यात उत्पादक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
सातारा, दि. ४ : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्रालय भारत सरकार, मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ , पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ,सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादक संस्था सक्षमीकरण कार्यशाळा” आज सातारा येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री संजयकुमार सुद्रिक, उपनिबंधक सहकार, सातारा जिल्हा यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून श्री गिर्राज अग्निहोत्री, प्रादेशिक संचालक, पुणे श्री प्रदीप सुर्वे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सातारा, सुश्री आकृष्टा, उपसंचालक, पुणे; तसेच डॉ. डी. एम. करंजकर, विभागप्रमुख, जीवशास्त्र विभाग, सातारा उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री संजयकुमार सुद्रिक यांनी एफपीओ आणि एफएफपीओ संस्थांनी मार्केटिंग, निर्यातामिमुख उत्पादन, मूल्यवर्धन आणि परस्पर व्यवसायिक लिंकजेस निर्माण करण्यावर भर द्यावा, असे सांगितले. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून कृषी व मत्स्य उत्पादक संस्थानी एकत्रितपणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्व अधोरेखित केले.
श्री गिर्राज अग्निहोत्री यांनी स्वागतपर भाषणातून एनसीडीसी च्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी उत्पादक संस्थांना च्या योजनांचा वापर करून स्वावलंबी, स्पर्धात्मक आणि शाश्वत व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. सुश्री आकृष्टा, उपसंचालक, एनसीडीसी पुणे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तसेच एफपीओ सक्षमीकरणासाठी द्वारे राबविण्यात येणाऱ्या नव्या योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी दोन्ही प्रकारच्या उत्पादक संस्थांनी या योजनांचा लाभ घेत एकात्मिक विकास मॉडेल स्वीकारावे, असे सांगितले.
श्री प्रदीप सुर्वे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सातारा यांनी एफएफपीओ प्रतिनिधीना मार्गदर्शन करताना सांगितले की मत्स्य संकलन, मासेमारी, अपघात आणि विमा यासंबंधीचे फॅक्चुअल रिपोर्ट्स नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे. तसेच अपघात विमा लाभार्थ्यांसाठी एनएफडीबी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री जयदीप पाटील, प्रतिनिधी, मुंबई जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादित यानी इपीओ आणि एफएफपीओ साठी उपलब्ध एनसीडीसी योजना व वित्तीय सहाय्य याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर श्री राहुल गोडसे, प्रतिनिधी, यांनी उत्पादनांची ऑनलाईन नोंदणी व विपणन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध संधी या विषयावर सत्र घेतले. तसेच श्री अमर डी. पाटील, कंपनी सचिव, यांनी शाश्वत व्यवसाय संधींची ओळख आणि नियोजन” या विषयावर मार्गदर्शन केले.













