खिलाडूवृत्तीने खेळत रहा, यश हमखास मिळेल : डी.वाय.एस.पी. श्री.सुनिल साळुंखे
वाई : खेळ हा विद्यार्थी जीवनातील एक महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या म्हणीचे महत्त्व आपणा सर्वांना माहित आहे. निरोगी शरीरासाठी आपणाला दररोज व्यायाम केला पाहिजे. खेळामुळे शिस्त, परिश्रम, जिद्द, संघभावना, नैतृत्व गुण वाढीस लागतात. या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेपासूनच आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. आपण उत्कृष्ट कौशल्य दाखवत राज्य, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरती यश मिळवू शकता. यामुळे तुम्हाला शासनाच्या क्रीडा विभागाचे पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. मीही कुस्ती क्षेत्रामध्ये उपमहाराष्ट्र केसरी झालो व मला हिंदकेसरी किताब मिळाला यामुळे डी.वाय.एस.पी. म्हणून शासकीय सेवेत संधी मिळाली.
अशीच आपल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील सुकन्या ललिता बाबर हिने ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत धडक मारल्यामुळे तिला डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट मिळाली. अशा अनेक विविध खेळातील यश मिळविलेल्या प्रतिभावान खेळाडूंना शासनाच्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ झाला आहे.व विजेतेपद मिळविणाऱ्या खेळाडूंना फायदाही होवू शकतो. असे उद् घार डी.वाय.एस.पी. वाई-सातारा श्री सुनिल साळुंखे यांनी काढले.
ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाई येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्या विद्यमाने सातारा जिल्हास्तरीय शासकीय शालेय हँण्डबॉल स्पर्धा २०२५-२६ शुभारंभ प्रसंगी साळुंखे बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, विश्वस्त दिलीप चव्हाण, प्रा दत्तात्रय वाघचवरे,दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार, क्रीडा अधिकारी स्नेहल शेळके,सचिन लेंभे आदि मान्यवर उपस्थित होते.
पार पडलेल्या सातारा जिल्हास्तरीय हँण्डबॉल स्पर्धेत ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाई 14 व 17 वर्षे मुले मुली या चारही संघानी सर्व प्रतिस्पर्धी संघाचे एकतर्फी पराभव करीत जिल्हा विजेतेपद मिळविले. या संघांची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली.
14 -वर्षाखालील मुले-
द्वितीय क्रमांक- यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बु
तृतीय क्रमांक -मालोजीराजे विद्यालय लोणंद
14 वर्षे मुली
द्वितीय क्रमांक – साधना स्कूल सातारा
तृतीय क्रमांक – ऐ.बी.पी.स्कूल सातारा
17 वर्षाखालील मुले-
द्वितीय क्रमांक – यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे बु
तृतीय क्रमांक -मालोजीराजे विद्यालय लोणंद
17- वर्षे मुली
द्वितीय क्रमांक -ऐ.बी.पी स्कूल सातारा
तृतीय क्रमांक-न्यू इंग्लिश स्कूल लोणंद.
संयोजन प्रमुख म्हणून क्रीडा विभागप्रमुख सचिन लेंभे यांनी यांनी काम पाहिले.स्पर्धेत पंच म्हणून शुभम इंग्लजकर,शुभम साळवी,अमित वाघांबरे, साहिल इनामदार, अर्नव भोईटे, शिवराज वरे, आशितोष साळुंखे,शुभम कांबळे, सचिन कुदळे, सुमित पोतेकर,यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन लेंभे यांनी व आभार विक्रांत पोळ यांनी मानले.
फोटो ओळी : उद्घाटनप्रसंगी श्रीफळ वाढविताना श्री सुनिल साळुंखे शेजारी एकनाथ जगताप, दिलीप चव्हाण,प्रा.दत्तात्रय वाघचवरे, दत्ता मर्ढेकर, शुभांगी पवार, सचिन लेंभे













