Thu, Jan 15, 2026
सहकार

किसन वीर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा

किसन वीर कारखान्याची मंगळवारी वार्षिक सभा
Ashok Ithape
  • PublishedSeptember 27, 2025

दि. २७ : भुईज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखानाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ३०) दुपारी एक वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध विषयांवर विचार करण्यासाठी बोलविण्यात आली आहे.

कारखान्याच्या सभासद शेतकरी बांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे. सभेस येतेवेळी प्रवेश पत्रिका व कारखान्याने दिलेले स्मार्टकार्ड सोबत आणावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!