Thu, Jan 15, 2026
आरोग्य

 स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु

 स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु
Ashok Ithape
  • PublishedSeptember 25, 2025

सातारा दि.24 : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बंद झालेल्या किमोथेरपी सेंटरची आरोग्य विभागशी पाठपुरावा करुन पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे.  यामुळे जिल्ह्यातील कर्करोग  रुग्णांना दिलासा मिळाला मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.

किमो थेरपी सेंटरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे,  निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. प्रमा गांधी  उपस्थित होते.

जे रुग्ण किमोथेरपीवर आहेत, अशा रुग्णांनी  आपले सर्व रिपोर्ट व किमोथेरपीबाबतचे कागदपत्रे घेऊन या रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा व या उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. करपे यांनी उद्घाटना प्रसंगी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!