Thu, Jan 15, 2026
यशोगाथा

डॉ.विक्रम शिंदे यांचा पी.एच.डी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

डॉ.विक्रम शिंदे यांचा पी.एच.डी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Ashok Ithape
  • PublishedSeptember 24, 2025

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील श्री.धनलक्ष्मी फाउंडेशनच्या ॲड.दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल, माळवडी मसूर, कराड येथे कॅम्पस डायरेक्टर आणि लेट ॲड. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मसूर या संस्थेचे प्राचार्य म्हणून कार्यरत असणारे डॉ.विक्रम रामचंद्र शिंदे यांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रवास हा नेहमीच विद्यार्थ्याना प्रेरित करत आलेला आहे. त्यांची समर्पित कार्यशैली, विद्यानिष्ठता आणि नेतृत्वदक्षता ही कायमच विद्यार्थ्यांसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरत आलेली आहे.

त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडत असताना त्यांचे अनेक पैलू पुढे येताना दिसत आहे.जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान असेच यश मिळविले असल्याचे म्हणावेसे वाटत आहे. डॉ.विक्रम रामचंद्र शिंदे हे प्रतिष्ठित शैक्षणिक, संशोधक आणि नेतृत्वगुण संपन्न आहेत. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई (मराठी माध्यम) येथे पूर्ण केले. विज्ञान शाखेतील बारावीचे शिक्षण वाय. सी. कॉलेज, सातारा येथून ८८% गुणांसह, तसेच पीसीबी गटात ९३% गुणांसह उत्तीर्ण झाले. त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड येथून बी. फार्मसी ही पदवी मिळवली.

अत्युत्तम शैक्षणिक गुणवत्तेची ओळख देती GAT परीक्षेमधील अखिल भारतीय क्रमांक ५१५ व महाराष्ट्रातील क्रमांक ९१,अशी ठळक कामगिरी,विद्यानिष्ठता आणि संशोधनात त्यांचे अग्रगण्य स्थान असून त्यांनी ३ पुस्तके, १९ संशोधन लेख आणि २ पेटंट्स प्राप्त केली आहेत. नुकतीच त्यांनी जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी,हैद्राबाद या शासकीय विद्यापीठातून पी.एचडी पदवी प्राप्त केली आहे. डॉ.विक्रम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कॅम्पसमध्ये विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. डिप्लोमा इन फार्मसी, डिप्लोमा इन लॅब टेक्नॉलॉजी, एमबीए, बीसीए, इंग्रजी माध्यम शाळा, ज्युनिअर सायन्स कॉलेज, बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग,पीबी बीएससी नर्सिंग, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आदींसारखे विविध अभ्यासक्रम घेतले जात आहेत.

या कॅम्पसवर अंदाजे २,५०० विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावत असताना डॉ. शिंदे हे महाराष्ट्र राज्य फार्मासी कौन्सिल, मुंबई यांच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरचे सदस्य आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनुभवी व्यक्तिमत्वाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थी घडविणारे एक शैक्षणिक वातावरण हे इथे निर्माण झालेले आहे. शिवाय गेली अनेक वर्षांचा अनुभव ज्यांच्याकडे आहे, त्यांचे मार्गदर्शनच योग्यप्रकारे आणि महत्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे डॉ.विक्रम रामचंद्र शिंदे यांचा प्रेरणादायी प्रवास हा अनेक विद्यार्थी घडविणारा मार्गदर्शन करणारा महत्त्वाचा दुवा ठरत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!