Thu, Jan 15, 2026
शिक्षण

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा

राज्यातील 4 लाख 92 हजार 532 असाक्षरांनी दिली पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीची परीक्षा
Ashok Ithape
  • PublishedSeptember 23, 2025
सातारा दि.22- केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात रविवारी २१ सप्टेंबर रोजी एकूण 4 लाख 92 हजार 532 असाक्षर व्यक्तींनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा दिली असल्याची माहिती राज्यातील पुणे येथील शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत, “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात असाक्षरांना साक्षर करण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा केंद्रशासनाच्या निर्देशानुसार रविवार, दि. २१ राप्टेंचर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हयांतील युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, ऊर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आली. या परीक्षेतून निकषानुसार परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रशासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाकडून नवसाक्षरांना प्रमाणपत्र व गुणपत्रक एकत्रित देण्यात येणार आहे. या चाचणीच्या माध्यमातून या व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यआरोग्याची काळजी व जागरुकता, वालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होण्यास होऊन पुढील जीवनमान उंचावण्यास मदत मदत होणार आहे.
 परिक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांना राज्यस्तरावरुन व विभागीय स्तरावरुन अधिकाऱ्यांनी निरीक्षक म्हणून भेटी दिल्या आहेत. राज्यातील सर्व शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी परिक्षेचे नियोजन करुन कामकाज यशस्वी केल्याबाबत अभिनंदन करुन शिक्षण संचालक श्री. पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!