Thu, Jan 15, 2026
कलाकार कट्टा

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

साताऱ्यात ‘रणरागिणी ताराराणी’ महानाट्याचे भव्य सादरीकरण प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध
Ashok Ithape
  • PublishedSeptember 19, 2025

सातारा दि. 18: सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या विशेष सहकार्याने आयोजित राज्य महोत्सवानिमित्त शाहू कला मंदिर येथे ऐतिहासिक महानाट्य ‘रणरागिणी ताराराणी’ चे भव्य सादरीकरण उत्साहात पार पडले.
शाहुकला मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार समीर यादव, पंकज चव्हाण यांच्यासह सातारा शहरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या श्रीगणेश पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रेक्षकांशी संवाद साधून राज्य महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
युवराज पाटील लिखित व विजय राणे दिग्दर्शित या महानाट्यात तब्बल ५० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. ताराराणींच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण पाहून रसिक भारावून गेले. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सादरीकरणाला दाद दिली. तसेच याचसोबत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले ‘भक्ती रेपोस्ट’ हे संगीतमय कार्यक्रम देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!