Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आजाद समाज पार्टी सातारा जिल्ह्यात लढवणार : केंद्रीय प्रभारी – गौरीप्रसाद उपासक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आजाद समाज पार्टी सातारा जिल्ह्यात लढवणार : केंद्रीय प्रभारी – गौरीप्रसाद उपासक
Ashok Ithape
  • PublishedSeptember 17, 2025

वाई l प्रतिनिधि: आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार. ॲड.चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार केंद्रीय प्रभारी-गौरीप्रसाद उपासक हे सातारा जिल्ह्यात समीक्षा बैठक व पञकार परिषदेसाठी वाई येथे आले होते येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील लढवणार असे प्रतिपादन पञकार परिषद आणि समीक्षा बैठकीत गौरीप्रसाद उपासक यांनी केले.

सातारा जिल्ह्याच्या समीक्षा बैठकीत सर्व तालुकानिहाय आढावा घेण्यात आला.ज्या,ज्या ठिकाणी आजाद समाज पक्ष ताकदीने उमेदवार उभे करु शकतो अशा जागांबाबत जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी सविस्तर चर्चा केली.

आजाद समाज पार्टी संविधान मानणाऱ्या पक्षांसोबत युती करू शकते याबाबत पञकारांना माहिती देण्यात आली.लवकर युती जाहीर होवु शकते असे गौरीप्रसाद उपासक यांनी संबोधित केले.
यानंतर महाराष्ट्र प्रभारी रुपेश बागेश्वर यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत उभे राहणार असे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र महासचिव हाजी मेमन यांनीही मुस्लिम आणि एस.सी. मतदार हे सातारा जिल्ह्यात एकञ आतील असेही सुचित केले.
सातारा जिल्हा समीक्षा बैठकीत वाई तालुकाध्यक्ष रुपेश खंडागळे आणि महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही तालुकानिहाय आढावा दिला.

वाई, आणि महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य लोकांनी आज आजाद समाज पक्ष प्रवेश केला. तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनाही नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान केले.

या समीक्षा बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, महासचिव संतोष कांबळे,सचिव अल्केश सोनवणे,विजय सपकाळ, कोमल कांबळे,अनिता खरात, राम गंगावणे,मनोज गंगावणे,तसेच महाबळेश्वर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!