लातूरच्या शाहू महाविद्यालयात पदव्युत्तर परीक्षेत जयंत लंगडे प्रथम
![]()
सौ. शीतल लंगडे यांचे पदविका परीक्षेत प्रावीण्य
सातारा/ प्रतिनिधी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये येथील जयंत माणिकराव लंगडे यांनी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयासह विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर त्यांच्या पत्नी सौ. शीतल लंगडे यांनी वृत्तपत्रविद्या जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमात लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात विशेष प्राविण्यसह प्रथम प्राप्त केली आहे.
लंगडे दांपत्याच्या या यशाबद्दल पत्रकारिता, साहित्य समाजसेवा आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
श्री. जयंत लंगडे गेल्या 30 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून वक्तृत्व, लेखन, प्रकाशन आदी क्षेत्रात सक्रिय आहेत. तर सौ शीतल लंगडे गेल्या पंधरा वर्षांपासून अक्षरा व शब्दप्रभू प्रकाशनाच्या माध्यमातून साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यापीठाचे यंदाचे पहिलेच वर्ष असून त्यासाठी लातूर, अमरावती व वर्धा ही तीन अभ्यासकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालय अभ्यास केंद्रातून जयंत लंगडे यांनी ही परीक्षा दिली होती.













