Thu, Jan 15, 2026
अध्यात्म

किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे पर्यावरणपूरक उपक्रमात मोलाचे योगदान

किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे पर्यावरणपूरक उपक्रमात मोलाचे योगदान
Ashok Ithape
  • PublishedSeptember 2, 2025

 

वाई , दि. २ सप्टेंबर २०२५ : जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी कॅडेट्सनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी वाई शहरातील विविध घाटांवर जनजागृती करून वाई पंचक्रोशीतील नागरिकांना गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने नदीमध्ये विसर्जन न करता त्या दान करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती स्वखुशीने एनसीसी कॅडेट्सकडे सुपूर्द केल्या. या उपक्रमामुळे नदी प्रदूषण रोखण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.या उपक्रमास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक भगवान गांगुली, तसेच किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. समीर पवार आणि कॅडेट्सनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सच्या या पर्यावरणपूरक कार्याचे स्थानिक नागरिकांकडून तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!