काटवली येथे ढोल पथक व महिलांच्या लेझिमने गणरायाचे उत्साहात स्वागत
भिलार, दि. २६ : ढोल ताशा, महिलांचे लेझीम पथक आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या घोषणांनी पांचगणी शहरासह परिसरातील गावागावात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. घरगुती गणरायाची दुपारी तीन पर्यंत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे भव्य मिरवणुकीने गावागावात अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले.
पाचगणी शहरातील विविध मंडळांच्या भव्य मूर्तींचे वाजत गाजत गणपती विराजमान होण्याच्या ठिकाणापर्यंत भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल पथक, लेझिम तसेच पारंपारिक बँडच्या निनाद पाहायला मिळाला. याच पद्धतीने भिलार, राजपुरी, खिंगर, गोडवली , भोसे, गुरेघर, रुईघर, काटवली, बेलोशी , दापवडी, महू करहर, हातगेघर या गावांमध्ये सार्वजनिक मंडळानी आपल्या बाप्पांचे भाऊ स्वागत केले.
काटवली येथे सार्वजनिक युवक मंडळाने आपली मिरवणूक दिमाखदारपणे काढले या मिरवणुकीत ढोल पथक, महिलांच्या उदंड प्रतिसादात लेझिम खेळत अनोख्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत सर्व महिला उत्साह सहभागी झाल्या होत्या.
फोटो काटवली : गावात ढोल पथक आनी महिलांच्या लेझिमने गणेशाचे स्वागत करण्यात आले. (रविकांत बेलोशे छाया चित्र सेवा)













