Thu, Jan 15, 2026
क्रीडा

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी
Ashok Ithape
  • PublishedAugust 25, 2025

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचेकडून अभिनंदन

मुंबई, दि. 24 : कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके, गाथा आनंदराव खडके आणि शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी कांस्य पदक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. विशेष म्हणजे गाथा आणि शर्वरी यांनी अमेरिकेच्या संघावर अचूक निशाणा साधत एकतर्फी विजय मिळविला आहे. या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

क्रीडा मंत्री ॲङ कोकाटे आपल्या संदेशात म्हणाले, अचूक निशाणा साधून पदकावर कोरलेले भारताचे नाव हा देशवासीयांसाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे यश अथक परिश्रम, मेहनत, संयम व जिद्दीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आपली ही ऐतिहासिक कामगिरी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. या विजयामुळे महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना नवे प्रेरणास्थान मिळाले असून राज्य शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही मंत्री श्री.कोकाटे यांनी नमूद केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!