Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता

कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग

कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग
Ashok Ithape
  • PublishedAugust 22, 2025
सातारा दि.22: स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित विशेष राष्ट्रीय कार्यक्रमात ‘समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या, कवठे ता. वाई या संस्थेला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील पदाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची आणि राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भूषण डेरे यांना व्यासपीठावर विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमात  केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यमंत्री  भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्यासह विशेष संवाद साधण्याची संधी मिळाली.
स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथील आयोजित चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहकार्य व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व जिल्हा प्रकल्प संचालक (आत्मा)  तसेच वाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!