Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

खोजेवाडी सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरचे ग्रामस्थांच्या हस्ते पूजन

खोजेवाडी सबस्टेशन ट्रान्सफॉर्मरचे ग्रामस्थांच्या हस्ते पूजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 13, 2025

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुधारण्याचा मार्ग मोकळा

सातारा : खोजेवाडी माळरान परिसरातील वीज पुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या सबस्टेशनचे काम अखेर पूर्णत्वास आले असून, काल नवीन ट्रान्सफॉर्मरचे पूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. या क्षणाची ग्रामस्थ गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.

सन 2020 मध्ये संजय घोरपडे हे सातारा पंचायत समीतीचे सदस्य असताना यांनी वितरण विभागाकडे सबस्टेशनची मागणी केली होती. शासनाने 2023 मध्ये मंजुरी दिल्यानंतर 2024 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. आता 2025 मध्ये काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच खोजेवाडी व परिसरातील गावांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पंचायत समिती सदस्य संजय बाबा घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आमदार मनोजदादा घोरपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पाठपुराव्याच्या काळात आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या माध्यमातून भाजप माजी प्रदेशाध्यक्ष ना.चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच MSCB चे डायरेक्टर विश्वासजी फाटक यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाला गती मिळाली. कार्यकारी अभियंता सुनील माने, अमित बारटक्के, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ,सिंकदर मुलाणी व अतीत सबस्टेशनचे अभियंता सचिन चव्हाण यांनी तांत्रिक सहकार्य दिले.
यावेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला
ट्रान्सफॉर्मरचे पूजन महिला ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने केले. सौ. हिराबाई घोरपडे, सौ. सुनीता साळुंखे व सौ. मनीषा सातपुते यांच्या हस्ते दोन्ही ट्रान्सफॉर्मर पूजले गेले. या वेळी श्री. आनंदराव निळू घोरपडे (आबा) आणि श्री. आनंदराव एकनाथ घोरपडे (आण्णा) यांनी श्रीफळ वाढविले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य भरत घोरपडे, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत शितोळे, ह. भ. प. सुशांत महाराज घोरपडे, संजूबाबा युवा मंच कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागातील शेती व उद्योगासाठी नवे पर्व-संजय बाबा घोरपडे

या सबस्टेशनमुळे खोजेवाडी व परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर होणार आहे. त्यामुळे शेती, उद्योग, शाळा व घरगुती वापरासाठी वीज खंडित होण्याचे प्रमाण लक्षणीय कमी होईल. “शेतकऱ्यांसाठी बारा तास वीज मिळावी यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहीन,” असे संजूबाबा घोरपडे यांनी सांगितले

फोटोओळ : खोजेवाडी येथील नवीन विद्युत टान्सफार्मरच्या पुजन प्रसंगी मा.पं.स.सदस्य संजय बाबा घोरपडे,व ग्रामस्थ खोजेवाडी

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!